सोनई वांबोरी रस्त्याची दुरावस्था मुरमाच्या वाहतुकीने रस्त्याची लागली वाट महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष
सोनई वांबोरी रस्त्याची दुरावस्था मुरमाच्या वाहतुकीने रस्त्याची लागली वाट महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष
सोनई /वार्ताहर // सोनई वांबोरी रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून सध्या पावसाळा सुरू असल्याने ठिकठिकाणी खड्डे पडल्याने या रस्त्याने प्रवास करणे म्हणजे मोठे अवघड होऊन बसले आहे या रस्त्याने प्रवास करताना वाहन चालकांना तारेवरची करावी लागत आहे त्यातच या रस्त्याने मुरमाची प्रचंड वाहतूक सुरू असते सुसाट वेगाने चालणारे ट्रॅक्टर व डंपर त्यामुळे कायमच या रस्त्यावर छोटे मोठे अपघात होत असतात सध्या शाळा सुरू असल्याने धनगरवाडी मोरया चिंचोरे येथील विद्यार्थ्यांना याच रस्त्याने ये जा करावी लागते त्यात अवैद्य मुरूम वाहतूक करणारे ट्रॅक्टर डंपर ये जा करत असल्याने त्याच्या वजनाने खड्डे जास्त प्रमाणात पडत आहेत याबाबत गौणखणीज वाहतुकीस आळा घालने गरजेचे आहे आहे याबाबत वृत्तपत्रातून आवाज उठवला असता अद्याप पर्यंत नेवासा तहसीलदार यांच्याकडून कुठल्याही प्रकारची दखल घेतली गेली नाही वृत्तपत्रातून बातमी प्रसिद्ध होताच काही दिवस बंद ठेवून पुन्हा नव्या जोमाने या मुरमाची वाहतूक केली जात आहे त्यामुळे या रस्त्याची पुरती वाट लागली आहे माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या हस्ते रस्ता करण्यासाठी उद्घाटन करण्यात आली मात्र अद्याप काही झाले नाही त्यामुळे हा रस्ता होणार की नाही हा प्रश्न आहे सोनई पासून पांजरपोळ पर्यंत रस्ता चांगला असून त्यापुढे मात्र अत्यंत खराब झाला आहे त्यामुळे लोकप्रतिनिधी यांनी यात लक्ष घालून रस्ता दुरुस्त करण्याची गरज आहे या रस्त्यावर छोटे-मोठे अपघात कायमच होत असतात भरधाव वेगाने चालणारे ट्रॅक्टर डंपर यामुळे या रस्त्याची अजूनच दुरवस्था होत आहे धनगरवाडी मोरे चिंचोरे कात्रड या भागातील लोकांचे रस्ता दुरुस्तीची मागणी केली आहे मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाकडून याची कुठली दखल घेतली जात नाही त्यामुळे सार्वजनिक बांधकाम खाते किंवा जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम खाते यांनी लक्ष घालून या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी केली जात आहे मात्र सातत्याने या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे नेवासा तहसीलदार यांनी अवैद्य गौणखाली वाहतुकीस पायबंद घालण्याची गरज आहे मात्र तहसीलदार काहीच कारवाई करत नसल्याने दिवसेंदिवस मुरमाचे चोरटी वाहतूक सुरू आहे सामान्य जनता कितीही बेबीच्या देठापासून ओरडली तरीही वाहतूक बंद होत नाही