आई-वडिलांनी लग्न करून दिले नाही म्हणून त्यांच्यावर हल्ल्याच्या तयारीत असणारा मुलगा राहुरी पोलिसांनी केला अटक,झटपट झालेल्या कारवाईने मोठा अनर्थ टळला .
* घातक शस्त्र बाळगणारा आरोपी राहुरी पोलिसांच्या ताब्यात*
सदर घटनेची हकीकत अशी की दिनांक 29/04/2024 रोजी मध्यरात्री राहुरी पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना माहिती मिळाली की कुरणवाडी गावचे शिवारात भागवत खिलारी हा एक लोखंडी धातूचे सुरा घेऊन आई वडिलांनी लग्न करून दिले नाही म्हणून त्यांच्यावर हल्ला करणार आहे.सदर माहितीची शहानिशा करणे कामी व योग्य कारवाई करणे कामे पथक नेमले असता सदर पथकाने खात्री करून शिताफीने तुषार भागवत खिलारी वय पंचवीस वर्षे राहणार कुरणवाडी तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर यास लोखंडी हत्यारासह ताब्यात घेऊन कारवाई करण्यात आलेली आहे.सदर इसमावर शस्त्र अधिनियम कलम 4 /25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला ,वैभव कलुबर्मे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर , विभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वात पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक शिंदे, गणेश सानप,सुरज गायकवाड, राहुल यादव, पोलीस पोलीस कॉन्स्टेबल भगवान थोरात , आदिनाथ पाखरे यांच्या पथकाने केलेली आहे.
राहुरी पोलीस स्टेशन मार्फत आव्हान करण्यात येते की अवैध्य शस्त्राबाबत काही माहिती असल्यास आपण पोलीस स्टेशनला माहिती कळवावी. आपले नाव गोपनीय ठेवण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे .