कर्म हीच ओळख असल्याने आबासाहेबांचा कर्मयोगी असा गौरव - ह भ प निलेश महाराज वाणी

कर्म हीच ओळख असल्याने आबासाहेबांचा कर्मयोगी असा गौरव - ह भ प निलेश महाराज वाणी

कर्म हीच ओळख असल्याने आबासाहेबांचा कर्मयोगी असा गौरव - ह भ प निलेश महाराज वाणी 

भारत भालेराव

ग्रामीण प्रतिनिधी शेवगाव

शेवगाव:आज दि 13 रोजी जगात संस्कृती टिकून असलेला एकमेव देश म्हणजे भारत आणि अश्या देशात माणूस म्हणून आपला जन्म झाला आहे त्यासाठी आपण भाग्यवान आहोत परंतु आबासाहेबांनी आयुष्यभर सर्वसामान्य जनतेसाठी अहोरात्र केलेल्या कार्यामुळे कर्म हीच त्यांची ओळख झाली आणि त्यांचा कर्मयोगी म्हणून आज आपण गौरव करत आहोत असे प्रतिपादन वैष्णव आश्रम बऱ्हाणपूर येथील ह भ प निलेश महाराज वाणी यांनी ढोरजळगाव येथे बोलताना केले.येथील श्रीराम माध्य व उच्च माध्यमिक विद्यालयात संस्थेचे संस्थापक कर्मयोगी आबासाहेब काकडे यांच्या 104 व्या जयंती सोहळ्याचे औचित्य साधून आयोजित संस्कार शिबिर प्रसंगी बोलताना शाळा ही ज्ञान देणारी इमारत नाही तर संस्कार घडवणारे केंद्र आहे आणि अशी ज्ञान मंदिरात आजच्या नवीन भरकटत चाललेल्या पिढीला संस्कार आणि संस्कृती टिकवण्यासाठी आध्यात्माच्या मार्गावर घेऊन जाणे ही काळाची गरज आणि आबासाहेबांनी निर्माण केलेल्या ह्या ज्ञानमंदिरातून हे कार्य अश्या उपक्रमांच्या आयोजनातून हे घडते आहे याचे समाधान आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य संजयजी चेमटे यांनी आपल्या मनोगतातून आजवर आयोजन झालेले उपक्रम आणि पुढे नियोजीत उपक्रम याविषयी माहिती सांगताना संस्कार शिबिर आयोजनाचा उद्देश सर्वांसमोर मांडला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन श्रीम पूनम वाबळे यांनी केले या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे प्राचार्य संजयजी चेमटे,पर्यवेक्षक सुनील जायभाये,संस्था प्रतिनिधी सुरेश तेलोरे,जेष्ठ शिक्षक सुधाकर आल्हाट यांचेसह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित

होते.