कामे मिळवण्यासाठी ठेकेदाराची बनवाबनवी अनेक ग्रामपंचायतींना फसवले गुन्हा दाखल करून घेण्यास पोलिसांची दिरंगाई
शेवगाव:-इलेक्ट्रिक ठेकेदाराने बनावट प्रमाणपत्राच्या आधारे कामे करून ग्रामपंचायतीला फसवी असल्याचा प्रकार उघड झाला आहे. याबाबत ग्रामपंचायतीने अशा व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्याचा अर्ज पोलिसांकडे केला मात्र तीन महिने होऊनही पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला नाही. यामुळे पोलिस कामात दिरंगाई करत असल्याचे निदर्शनास आले. तालुक्यात वित्त आयोग निधी अनुसूचित जाती व नवबौद्ध घटक वस्ती विकास योजनेअंतर्गत स्थानिक स्तरावर ग्रामपंचायत मार्फत विद्युत विकास कामे शासन नोंदणी परवाना असणाऱ्या अधिकृत ठेकेदारामार्फत केले जातात. या ग्रामपंचायतीमार्फत होणारी कामे मिळावीत म्हणून काही ठेकेदार कमी दराने निविदा दाखल करून कामे हस्तगत करण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र पाथर्डी तालुक्यातील एका व्यक्तीने इलेक्ट्रिक फार्मचे संगणकावर बनावट नोंदणी प्रमाणपत्र तयार करून त्याआधारे ग्रामपंचायतीची फसवणूक केल्याचे उघड झाली आहे.
बेलवंडी कोठार ता. श्रीगोंदा येथील मे स्वराज्य इलेक्ट्रिकल याची विद्युत कंत्राटदार वर्ग क मध्ये नोंदणी आहे याच नोंदणी प्रमाणपत्राचे संगणकावर एडिट करून पाथर्डी तालुक्यातील एका व्यक्तीने बनावट कंत्राटदार नोंदणी प्रमाणपत्र तयार केले त्या आधारे त्याने ग्रामपंचायतीमार्फत होणारी काही इलेक्ट्रिक कामे शेवगाव पाथर्डी तालुक्यात करत आहे जिल्हा परिषदेकडे तक्रार केली या तक्रारी ने दक्षिण बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रवीण जोशी व ग्रामपंचायतीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी निखिल ओसवाल यांच्या चौकशी समितीने केलेल्या चौकशीत प्रमाणपत्र बनावट असल्याचे सिद्ध झाले.
शेवटी पोलिस अधीक्षकांकडे तक्रार
या व्यक्तीने बनावट प्रमाणपत्र आधारे तालुक्यातील वाडगाव ग्रामपंचायतीची इलेक्ट्रिक कामाद्वारे फसवणूक केली असून त्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश तीन महिन्यापूर्वी दिले होते या आदेशाचे वाडगाव ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यास गेले असता वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे बोट दाखवून हा गुन्हा दाखल करून घेतला नाही त्यानंतर पोलिस उपविभागीय अधिकाऱ्यांकडे केलेल्या तक्रारी पोलिस अधीक्षकांकडे तक्रार करण्याचे सांगण्यात आले शेवटी मार्च महिन्यात जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे लेखी तक्रार केली मात्र अद्यापही या व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला नाही.
इतरही प्रमाणपत्राचा शोध घ्यावा जिल्हापरषद प्रशासनाचे आदेश असताना बनावट प्रमाणपत्राच्या आधारे ग्रामपंचायतीची फसवणूक करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यास पोलीस का दिरंगाई करत आहेत याबाबत अनेक तर्कवितर्क काढले जात आहेत बनावट प्रमाणपत्राच्या आधारे शेवगाव पाथर्डी तालुक्यात केलेल्या कामाची चौकशी करून आणखीही इतरही बनावट प्रमाणपत्र आहे काय याचा शोध घ्यावा अशी मागणी होत आहे.