विद्या तंवर राष्ट्रीय दीपस्तंभ पुरस्काराने सन्मानित, बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघातर्फे पत्रकार दिनानिमित्त राष्ट्रीय पुरस्कार वितरण समारंभ उत्साहात संपन्न.
) ः दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ या राष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या पत्रकार संघटनेच्या वतीने पत्रकार दिनाचेे औचित्य साधून शनिवार दि. 7 जानेवारी रोजी राष्ट्रीय पत्रकार मेळावा व दीपस्तंभ राष्ट्रीय पुरस्कार वितरण समारंभ नाशिकच्या मुं.श. औरंगाबादकर सभागृह, सार्वजनिक वाचनालय शालिमार, नाशिक येथे मोठ्या थाटात संपन्न झाला.
समाजाला दिशा दाखविण्याचे व मार्गदर्शन करण्याचे काम करणार्या कर्तृत्ववान व्यक्तींना दीपस्तंभ राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना आदरांजली वाहण्यासाठी दरवर्षी पत्रकार दिनानिमित्त राष्ट्रीय मेळाव्याचे आयोजन गेल्या दहा वर्षापासून करीत असल्याचे राष्ट्रीय अध्यक्ष महेंद्र देशपांडे यांनी सांगितले.
या पुरस्कार सोहळ्यास महाराष्ट्रासह गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश, बिहार आदी राज्यातून पुरस्कारार्थी उपस्थित होते.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेत्री मेघा पाटील, माजी मनपा सभागृह नेते व मा. नगरसेवक दिनकर अण्णा पाटील, सुप्रसिद्ध उद्योजक डॉ. दिनेश क्षिरसागर, आंतरराष्ट्रीय जादुगार शिरीषकुमार हे उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमाला अभिनेत्री स्मिता प्रभू, आंतरराष्ट्रीय जादुगार स्नेहराज इंद्रजीत, डॉ. प्रा. शोभा सातभाई, ड्रीम डेस्टीनेशनच्या संचालिका शबनम खान, पैठणी उद्योजक अमोल शिंदे यांच्या सह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
प्रास्ताविक महेंद्र देशपांडे यांनी केले तर आभार माधुरी देशपांडे मानले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शिल्पा फासे यांनी केले.