दोन दिवस वीज गायब झाल्याने महावितरणाचा निषेध

दोन दिवस वीज गायब झाल्याने महावितरणाचा निषेध

शेवगाव:-महावितरणाचा अनागोंदी कारभार व त्यामुळे खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्यास तब्बल पंचेचाळीस तासाचा लागलेला कालावधी त्यामुळे शेवगाव शहरातील शास्त्रीनगर भागातील रहिवाशांना भर उन्हाळ्यात दोन दिवस व दोन रात्री विजया भवी काढावे लागल्या त्यामुळे या काळात झालेल्या त्रासामुळे परिसरातील रहिवाशांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करीत निषेध नोंदवला.

या परिसरात मंगळवारी सायंकाळी सात वाजता खंडित झालेला वीजपुरवठा गुरुवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास पूर्ववत करण्यात आला. शिवसेनेचे शहर प्रमुख सिद्धार्थ काटे युवा सेनेचे तालुकाप्रमुख शीतल पुरनाळे विज वितरणचे ज्ञानेश्वर बडदे साहेब डोईफोडे यांनी याबाबत वीज वितरणाच्या अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला.

या परिसरास बाजार समिती समोरील रोहित रातून वीज पुरवठा केला जातो सदर रोहित रात 3 फेज असून त्यापैकी एक फेज मंगळवारी सायंकाळ सात वाजण्याच्या सुमारास जळाल्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला नवीन रोहित्र येईपर्यंत दोन फेज मधून एक बंद करून आळीपाळीने जो पे जळाला आहे तेथे वीज पुरवठा करणे आवश्यक होते किबहुना तसे करावे असे संकेत आहेत परंतु महावितरणचे उपकार्यकारी अभियंता शहर अभियंता यांनी काही दखल घेतली नाही या भागातील रहिवाशांना विजयाबाई तब्बल 45 तास राहावे लागले सध्या उन्हाळ्याचे दिवस असून ज्यादा वीज वापर असल्याने रोहित्र जळाल्याचे प्रकार वारंवार घडत असतात त्यामुळे तालुकास्तरावर किमान दोन रोहित्रे राखीव ठेवायला हवेत पण तसे होत नाही रोहित्र अहमदनगर येथून आणावे लागते. त्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो शेवगाव शहराची लोकसंख्या सुमारे 50 हजार असून वीज बिलाची शहरातील वसुली जिल्ह्यात प्रथम क्रमांकाची आहे तरीही नवीन रोहित्रा साठी दोन तीन दिवस ताटकळत बसावे लागते हे शहरातील नागरिकांची दुर्दैव आहे.