बालाजी देडगाव येथे संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा.
नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या ठिकाणी सर्व प्रतिष्ठित मान्यवरांच्या हस्ते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देडगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे नूतन संचालक रामभाऊ तांबे होते तर या कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवा नेते हरिभाऊ तागड यांनी केले .
यावेळी ते म्हणाले की विश्वरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान लिहिले त्यामुळे सर्वसामान्य माणूस सुखी व समाधानी व शांत आहे .कायदा सुव्यवस्था ही सर्वांसाठी आहे ही खरी लोकशाही आहे . या संविधान साठी महामानव डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांना 2 वर्षे 11 महिने व 18 दिवस लागले.जगामध्ये लोकशाही उच्च प्रणाली आहे .मला अभिमान वाटतो की मी या भारत देशात जन्माला आलो.
यानंतर चाइल्ड करिअर इंग्लिश स्कूलचे संस्थापक तथा सोसायटीचे विद्यमान संचालक सागर बनसोडे सर, देडगावचे विद्यमान सरपंच चंद्रकांत पाटील मुंगसे, युवा नेते निलेश कोकरे व आदी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. यांनीही संविधानाबाबत अतिशय मोलाची माहिती देत आलेल्या मान्यवरास मार्गदर्शन केले.
यावेळी देडगाव चे विद्यमान उपसरपंच लक्ष्मणराव गोयकर, शिवनेरी ग्रुपचे अध्यक्ष एकनाथ फुलारी, माजी सरपंच दत्ता पाटील मुंगसे , वंचित बहुजन आघाडीचे बलभीम सकट,गोरखराव देवकाते, दूध डेअरीचे चेअरमन हरिभाऊ कदम, पास्टर मनवेल हिवाळे, माजी चेअरमन अरुणराव बनसोडे, नाभिक संघटनेचे भारत औटी, भागवत दीक्षित, प्रगतशील बागातदार शेतकरी शिवाजीराव मुंगसे, गोरख माळी ,भैय्या जावळे, नितीन ससाणे, करमचंद हिवाळे, भास्कर गोयकर, दिपक गोयकर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार युनूस पठाण यांनी केले तर या कार्यक्रमाचे आभार युवा नेते किशोर वांढेकर यांनी मा
नले.