चाइल्ड करिअर इंग्लिश स्कूल सलबतपुर येथे पत्रास कारण की, उपक्रमास विद्यार्थ्याचा मोठा प्रतिसाद
*चाईल्ड करीअर मध्ये पत्रास कारण की,उपक्रमास विद्यार्थ्यांचा प्रतिसाद*
कृतीयुक्त अध्यापन करणारी शाळा म्हणून अल्पावधीत नावारूपास आलेल्या सलाबतपुर येथील चाईल्ड करीअर इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ने स.न. वि.वि.पत्रास कारण की ,हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवला.कृतियुक्त अध्यापन हे मानवी जीवनात खूप उपयुक्त आहे असे अध्यापन करणारी शाळा म्हणजे "चाइल्ड करिअर इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज "सलाबतपुर.
मुलींची पहिली शाळा स्थापन करणारे 'महात्मा फुले' यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून विद्यालयात 'पत्रास कारण की..." हा उपक्रम हाती घेतला.
संगणकाच्या युगात पत्रास अनन्य साधारण महत्त्व देऊन मुलांनी आनंदाने यात सहभाग घेतला.आपले विचार,भावना इतरांपर्यंत पोहोचवण्याचे एक प्रभावी माध्यम म्हणजे पत्र. कमी पैशात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पत्र पाठवले जाते. माहिती तंत्रज्ञानाच्या युगात पत्र हा एक नवलाईचा विषय ठरतो.पण चाईल्ड करीअर इंग्लिश मिडीयम स्कूल ने या हरवत चाललेल्या पोस्टाच्या पत्रास वेगळ्या प्रकारे नवसंजीवनी दिली.
परीक्षेसाठी पाच गुणांचा हा विषय प्रत्यक्षपणे राबवल्यामुळे हा उपक्रम नाविन्यपूर्ण ठरला. यासाठी संस्थेचे अध्यक्ष श्री सागर बनसोडे सर यांची प्रेरणा मिळाली. सदर उपक्रम यशस्वितेसाठी सर्व शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी विशेष परिश्रम घे
तले.