महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री तथा पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री ना .राधाकृष्ण विखे यांनी घेतले पैस खांबाचे दर्शन.
खेडले परमानंद प्रतिनिधी
संत ज्ञानेश्वरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या श्री क्षेत्र नेवासा येथे आज महसूल,पशुसंवर्धन दुग्धविकास मंत्री तथा पालकमंत्री अहमदनगर नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी पैस खांबाचे दर्शन घेऊन मंदिर स्वच्छता अभियानात सहभाग घेतला.
मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन यावेळी महसूल मंत्री विखे यांनी केले .
माऊलींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या व ग्रंथराज ज्ञानेश्वरी चे जन्मस्थान असलेले हे तीर्थक्षेत्र संपूर्ण विश्वासाठी गौरवपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी सर्व स्वच्छता कर्मचाऱ्यांसमवेत संवाद साधला. तसेच शहरातील राम मंदिर आणि मोहिनीराज मंदिरातही जाऊन कार्यकर्त्यांच्या समवेत रामनामाचा जयघोष केला.
*याप्रसंगी माजी आमदार , बाळासाहेब मुरकुटे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे, नितीन दिनकर ऋषिकेश शेटे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब फुलारी किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष अंकुश काळे जिल्हा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सुभाष पवार आदिनाथ पटारे यांच्यासह समस्त नेवासा भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.