गणपती विसर्जनाच्या दिवशी पहाटेच हातभट्टी स्थळांवर राहुरी पोलिसांच्या धाडी,1,36,400 / - रू . किंमतीचा मुद्देमाल जप्त .

गणपती विसर्जनाच्या दिवशी पहाटेच हातभट्टी स्थळांवर राहुरी पोलिसांच्या धाडी,1,36,400 / - रू . किंमतीचा मुद्देमाल जप्त .

           गणपती विसर्जनाच्या दिवशी पहाटेच 4 वाजता राहुरी पोलिसांच्या धाडी पडल्याने हातभट्टी तयार करणारांचे 

धाबे दणाणले आहेत . राहुरी तालुक्यात दोन नंबर धंदे करणा-यांना चाप बसायला नक्कीच सुरुवात झाली आहे . राहुरी तालुक्याचा पोलिस विभाग आता ॲक्शन मोडमध्ये येताना दिसत आहे . आजच्या या धडक कारवाईने दोन नंबर धंदे करणारांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत .

 

           राहुरी पोलिसांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार देवळाली प्रवरा, फॅक्टरी, लाख या ठिकाणी हातभट्टी तयार करणाऱ्या अड्ड्यांवर धाडी टाकून सुमारे 2000 लिटर रसायन व 2500 लिटर हातभट्टीची दारू असा 1,36,400 / - रूपये किंमतिचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून गुन्हेही दाखल करण्यात आले आहे .

 

       सदरची कारवाई ही मा. पोलिस अधीक्षक यांच्या सुचनेनुसार करण्यात आली असून या कारवाईमुळे गणपती विसर्जन मिरवणुकीत होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी प्रभावी ठरणार असल्याचे मत राहुरीचे पो.नि. प्रताप दराडे यांनी सांगितले आहे .

 

      हातभट्टीवर धडक कारवाई करण्यासाठी राहुरी पोलिस स्टेशनचे पो.स .ई . सज्जनकुमार न-हेडा, ज्योति डोके, रमीझपात्र, पो. ह. पारधी, पो.शि. लिपणे, गुणवंत, शिरसाठ, कु-हाडे व धाकणे यांचा समावेश होता . गणेश विसर्जनाच्या दिवशी झालेल्या या कार्यवाहीमुळे राहुरी पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे तसेच सर्व गणेशभक्तांनीही या कार्यवाही बदद्ल राहुरी पोलिसांना शुभेच्छा दिल्या आहेत .