अजून एका अल्पवयीन मुलीची सुटका लैंगीक अत्याचार अनैतिक कृत्य करण्याच्या उद्देशाने पळून नेणाऱ्या आरोपीस मित्राच्या सहाय्याने अटक.

राहुरी पोलीस स्टेशन गु र न 1263/243भारतीय दंड विधान संहितेचे कलम 363 अन्वये दिनांक 9/11/23 रोजी गुन्हा दाखल असून दाखल गुण्हयाच्या तपासामध्ये सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीस आरोपी साजन सुदाम माळी वय 22 वर्ष राहणार राहुरी खुर्द याने त्याचा मित्र नामे विकास नामदेव बर्डे वय वीस वर्ष राहणार राहुरी खुर्द यांच्या मदतीने पळवून नेले होते. सदर आरोपीने पीडित मुली सोबत लैंगिक कृत्य करून विवाह करता यावा या उद्देशाने पळवुन नेल्याचे व अत्याचार केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने , सदर गुन्ह्यात भारतीय दंड विधान संहितेचे कलम 366,376(2)(N) r/w POCSO Act कलम 4,8,12 वाढवण्यात आले असून पळवून नेण्यास मदत देणाऱ्या विकास नामदेव बर्डे वय वीस वर्ष राहणार राहुरी खुर्दस यास दिनांक 06/02/2024 रोजी दाखल गुन्ह्याच्या तपास कामी तथा लैंगिक अत्याचारासाठी पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीचा शोध घेणे कामी अटक केलेले होते. त्याने दिलेल्या माहितीनुसार सदर गुन्ह्यातील पीडित अल्पवयीन मुलीची सुटका करून तिला तिचे आजीचे ताब्यात मानसिक आधार देण्यासाठी देण्यात आलेली असून मुख्य आरोपी साजन सुदाम माळी वय 22 वर्ष राहणार राहुरी खुर्द यास दिनांक 11/2/2024 अटक करण्यात आले असून त्यास आज माननीय न्यायालयाने चार दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड सुनावली आहे.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास PSI चारुदत्त खोंडे करत आहे. .
सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला साहेब अप्पर पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक श्री वैभव कलुबर्मे , विभागीय पोलीस अधिकारी डॉ श्री बसवराज शिवपुजे साहेब यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वात PSI चारुदत्त खोंडे पोलीस हवालदार शेळके पोलीस हवालदार वैराळ पोलीस कॉन्स्टेबल बडे पोलीस कॉन्स्टेबल ईफ्तेतेखार सय्यद यांच्या पथकाने केलेली आहे.
अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेणे तथा लैंगिक अत्याचार करणे यावर प्रतिबंध व्हावा म्हणून राहुरी पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व शाळांमध्ये कायदेविषयक जनजागृती करून विद्यार्थ्यांना प्रबोधन करण्यात येत आहे. आज रोजी पोलीस निरीक्षक ठेंगे यांनी वांबोरी येथील महेश मुनोत विद्यालय येथे विद्यार्थ्यांशी संवाद साधत मार्गदर्शन केले व अपहरणाच्या कायद्याविषयी माहिती दिली.
सर्व नागरिकांना आव्हान करण्यात येते की अशाप्रकारे अल्पवयीन मुलींना विवाह करण्यासाठी /लैंगिक अत्याचार करण्यासाठी पळवून नेण्यास कुणी सहकार्य करत असल्यास त्याबाबतची माहिती असल्यास आपण पोलीस स्टेशनला माहिती कळवावी. आपले नाव गोपनीय ठेवण्यात येईल. तसेच सर्व पालकांनी आपल्या मुलांचे वर्तन संशयास्पद वाटल्यास त्यांचेवर बारकाईने लक्ष ठेवावे असे आव्हान करण्यात येत आहे.