म. फु . कृ.वि.कर्मचारी समन्वय संघ व मागासवर्गीय कल्याणकारी संघाने महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कुलसचिवांना दिले निवेदन .
*म.फु.कृ.वि.कर्मचारी समन्वय संघ व मागासवर्गीय कल्याणकारी संघाने महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या कुलसचिवांना दिले निवेदन*
*कृषि विद्यापीठ व कुलगुरू यांची होत असलेली बदनामी विरोधात कर्मचारी समन्वय संघ व मागासवर्गीय कल्याणकारी संघाने कृषि विद्यापीठाच्या कुलसचिवांना दिले निवेदन*
महात्मा फुले कृषि विद्यापीठ आणि मा. कुलगुरु डॉ. पी. जी. पाटील यांच्याबद्दल काही विघ्नसंतोषी घटकांकडून बदनामी होत आहे. या बदनामी विरोधात महात्मा फुले कृषि विद्यापीठातील कर्मचारी समन्वय संघ व मागासवर्गीय कल्याणकारी संघाने कृषि विद्यापीठाच्या कुलसचिवांना दिले निवेदन.कृषि विद्यापीठ व कुलगुरूंची होत असलेली बदनामी संदर्भात कृषि विद्यापीठातील कर्मचारी समन्वय संघ व मागासवर्गीय कल्याणकारी संघने तीव्र निषेध व्यक्त केला आहे.
निवेदनात असे म्हटले आहे कि या बदनामीमुळे देशभर नावलौकीक प्राप्त असलेल्या व उत्कृष्ट मानांकन प्राप्त असलेल्या विद्यापीठाची प्रतिमा या विघ्नसंतोषी घटकांमुळे मलिन होत आहे. अशा विघ्नसंतोषी घटकांचा महात्मा फुले कृषि विद्यापीठ कर्मचारी समन्वय संघ, राहुरी व मागासवर्गीय कल्याणकारी संघ, राहुरी जाहिर निषेध करीत आहे. महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे मा. कुलगुरु डॉ. पी.जी.पाटील यांनी कुलगुरुपदाचा कार्यभार मार्च 2021 मध्ये स्वीकारल्यानंतर त्यांनी विद्यापीठाशी संबंधित सर्व घटकांना यथोचित न्याय दिलेला आहे. शिक्षण, संशोधन व विस्तार कार्यामध्ये विद्यापीठ चांगल्याप्रकारे नावलौकीक प्राप्त करत आहे. नुकतेच विद्यापीठाला नवी दिल्ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषदेकडून "अ" उत्कृष्ट श्रेणीत मानांकन प्राप्त झालेले आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना दिल्या जाणा-या सुविधांनुसार व शिक्षणाच्या दर्जानुसार हे मानांकन दिले जाते. विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी नुकताच राज्य पातळीवरील झालेल्या स्पर्धांमध्ये दोन सुवर्णपदके प्राप्त केलेली आहेत.
काही विघ्नसंतोषी घटकांकडून निवडणूक आयोगाकडे केलेल्या तक्रारीत आचारसंहिता भंग, कार्यालयीन अनियमितता, कर्मचा-यांच्या नियमबाह्य बदल्या व पदोन्नती या बाबत केलेल्या प्रशासनाविषयी तक्रारी याबाबत मा. निवडणूक आयोगाने दिलेल्या पत्रानुसार खुलासा स्पष्ट करुन व तक्रारी निकाली काढलेल्या असतांनासुध्दा समाजमाध्यमांमध्ये विद्यापीठ प्रशासनाविषयी चुकीच्या व दिशाभुल करणा-या बातम्या प्रसारीत केलेल्या आहेत. अशा बाबींचा महात्मा फुले कृषि विद्यापीठ कर्मचारी समन्वय संघ राहुरी व मागासवर्गीय कल्याणकारी संघ, राहुरी तीव्र निषेध व्यक्त करीत आहे.
सध्या विद्यापीठाची परिस्थिती रिक्त पदांच्या बाबतीत अत्यंत गंभीर असतांना देखील मा. कुलगुरु यांच्या कार्यकुशलतेमुळे विद्यापीठाचे कार्य हे प्रगतीपथावर आहे आणि हे फक्त विद्यापीठातील कर्मचारी व अधिकारी यांचे प्रामाणिकपणे अहोरात्र एकत्रित कष्टामुळेच शक्य झाले आहे. यासाठी मा. कुलगुरु महोदयांपासून व सर्व संचालक तथा सर्व वरिष्ठांचे सतत मोलाचे मार्गदर्शन महत्वाचे ठरले आहे. वर्ग 4 पासून वर्ग 1 पर्यंत सर्व पदांवरील पदोन्न्तीचे पदे वेळेत भरलेली आहेत. अनुकंपामधील सर्व वारसांना प्रत्येक वर्षी तात्काळ नियुक्ती देण्यात आलेली आहे. लाड पागे समितीतील लाभार्थ्यांना तात्काळ नियुक्ती आदेश दिलेले आहेत. कर्मचा-यांची कार्यक्षमता वाढविणेसाठी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील कर्मचारी तथा अधिका-यांच्या सोयीनुसार पदस्थापना करण्यात आलेल्या आहे. मा. कुलगुरु महोदयांच्या सकारात्मक प्रयत्नामुळे 16 वर्षापासून प्रलंबीत प्रकल्पग्रस्तांचा कृषि विद्यापीठात नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे व सेवानिवृत्त कर्मचा-यांना निवृत्तीच्या दिवशी ग्रॅच्युईटी व सेवानिवृत्तीचे लाभ वेळेवर मिळत आहेत. विद्यापीठाचे तंत्रज्ञान प्रभावीपणे शास्त्रज्ञांमार्फत शेतक-यापर्यंत पोहचविण्यासाठी कृती सुरु आहे. मा. कुलगुरु महोदयांच्या सकारात्मक प्रयत्नामुळे 12 वर्षापासून प्रलंबित असलेली दोन लाभांची (12 व 24 वर्षे) "सुधारीत सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना" वर्ग 3 व वर्ग 4 सवंर्गातील कर्मचा-यांना पूर्वलक्षी प्रभावाने आर्थिक लाभ लागू करण्यात आलेले आहेत. त्यामुळेच विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी यांची मानसिकता व कार्यशैलीत सकारात्मक बदल होऊन विद्यापीठाची वाटचाल प्रगतीपथावर आहे.
सन्माननिय कुलगुरुंच्या गतीशील, पारदर्शक कामामुळे विद्यापीठातील सर्व अधिकारी / कर्मचा-यांना न्याय मिळत असून विद्यापीठाचे नावलौकीक होत आहे व कोणावरही अन्याय होण्याच्या भावना कर्मचा-यांमध्ये नाहीत. अशा कृतीशील कुलगुरुंविरोधात काही घटकांकडून मा. कुलगुरुंची आणि कुलसचिवांची बदनामी होत आहे. महात्मा फुले कृषि विद्यापीठ कर्मचारी समन्वय संघ, राहुरी व मागासवर्गीय कल्याणकारी संघ, राहुरी या बाबींचा तीव्र निषेध व्यक्त करीत आहे.