लंपी आजाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता घोडेगाव येथील गो जातीय जनावरांचा बाजार बंद..
प्रतिनिधी
नेवासा तालुक्यातील सर्व पशुपालक शेतकरी व व्यापारी यांना माननीय जिल्हाधिकारी सिद्धाराम सालिमठ यांनी जनावरांना होणारा लंम्पी या रोगाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून सुमारे एक महिना जनावरांचा खरेदी विक्रीसाठी होणारा बाजार बंद ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत .
काही महिन्यापूर्वी महाराष्ट्र राज्य मध्ये जनावरांना होणाऱ्या लंम्पी या आजाराने धुमाकूळ घातला होता .यामध्ये अनेक शेतकऱ्यांची जनावरे दगावली होती .जनावरांना ताप येणे,अंगावर सर्वत्र फोड येणे,अंगावरील फोड फुटल्यानंतर त्यातून घाण बाहेर येणे या प्रकारची लक्षणे हा रोग झालेल्या जनावरांना दिसत होती .या रोगाच्या निर्मूलनासाठी सर्वत्र लसीकरण मोहीम राबवण्यात आली होती परंतु काही ठिकाणी या रोगांनी पुन्हा डोके वर काढल्याचे दिसू लागले आहे.
हा रोग आटोक्यात आणण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती नेवासा यांना आदेशाद्वारे सूचना केली आहे की सर्व पशुपालक शेतकरी व व्यापारी यांना लंपी या रोगाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून शुक्रवार दिनांक 25 /8 /2023 पासून पुढे आदेश होईपर्यंत कृषी उत्पन्न बाजार समिती नेवासा उपवास घोडेगाव येथील गोजतीय प्रजातीचे जनावरे बाजार बंद राहील तसेच शुक्रवार दिनांक 01/09/2023 पासून फक्त शेळी व मेंढी बाजार पुरवत सुरू राहील .याची सर्व पशुपालक शेतकरी व व्यापारी यांनी नोंद घ्यावी असे सुचित केले आहे .