जीव लावला तर रानच पाखरू जवळ येत,शनिशिंगणापूर मध्ये चक्क कावळा नाश्ता करण्यासाठी येतो.
प्रतिनिधी खेडले परमानंद नेवासा
कावळ्याला लागला माणसाचा लळा. कावळा करतो चक्क हातावर बसुन नाश्ता शनिशिंगणापूर येथील लक्षवेधी घटना.
हिंदू संस्कृती नुसार कावळ्याला आपल्या पूर्वजांचे पितरांचे स्वरूप मानले जाते.कावळे परिवर्तन आणि बदलाचे प्रतीक आहेत. तो सावध प्राणी आहे त्याच्याकडे तीक्ष्ण आणि शक्तिशाली दूरदृष्टी आहे. जर तुम्ही कावळा ओराडला आणि त्याचा प्रतिकूल परिणाम म्हणून विचार केला, तर तुम्ही हे लक्षात ठेवले पाहिजे की हे अनेक संभाव्य परिणामांपैकी एक आहे.
घराच्या खिडकीवर किंवा दारावर येऊन कावळा ओरडू लागला की, पाहुणे येणार असल्याचे संकेत असल्याचे लोकमान्यता रुढ आहे. तसेच घराच्या खिडकीवर किंवा दारावर कावळ्याने केलेली विशिष्ट कृती पूर्वजांचे आशीर्वाद मानली जाते. कावळा चोचीत फूल-पाने घेऊन आला, तर तो शुभ संकेत मानला जातो. याचा अर्थ आपल्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत.
पितृपक्षात किंवा दशक्रिया विधीच्या वेळी कावळ्याला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे पिंडदान विधी दरम्यान काकस्पर्श हा अतिशय महत्त्वाचा समजला जातो.
पिंडदान केल्यानंतर काकस्पर्श झाल्याच्या नंतर कावळा किती घास खातो यावरून आपले पूर्वज किंवा पित्र आपल्यावर किती समाधानी आहेत याचा तर्क लावण्यात येतो.
काकस्पर्श न झाल्यास पिंडदानाचा विधी हा अधुरा मानला जातो म्हणजे पिंडदान पूर्ण होत नाही.
शास्त्रानुसार कावळ्याचे शास्त्रात अनेक महत्त्वपूर्ण गुणधर्म सांगितलेले आहेत.
रामायण महाभारतात कावळ्या विषयी अनेक शास्त्रोक्त माहिती दिलेली आहे.
अशीच कावळ्याच्या बाबतीत एक घटना घडली असून कावळ्याच्या या नित्यक्रमाबद्दल परिसरात एक चर्चेचा व कुतूहलाचा विषय ठरत आहे.
शनी शिंगणापूर येथील पानसनाला परिसरातील शेटे वस्तीवर एस बी शेटे यांच्या बाल्कनीत नित्य नियमाने एक कावळा हजेरी लाऊन शेटे यांच्या नातवा समवेत येत आसतो कोणत्याही पक्षाच्या बाबतीत वेगवेगळे जीवनातील वेगवेगळे शुभ -अशुभ संकेत सांगितले जातात, असाच एक प्रकार मुक्या प्राणीवर व मुकी पक्षवार जर आपण केले तर प्रत्येक व्यक्ति ला मोठे पुण्य मिळते असे सागतात.
असाच एक प्रकार नेवासा तालुक्यातील सोनई जवळील पानसनाला येथील निसर्गप्रेमी सर्वांगिन परिचित असणारे एस. बी. शेटे म्हणून शनिशिंगनापुर पंचकरोशितील रहिवासी हे दरोरोज आपल्या निवासस्थानी नित्यानियम नुसार दैनिदिनी कामात रोज वेळेला एक कावळा बालकनीत चहा पिताना, जेवण करताना, हा महत्वाचा कावळा नातवा सोबत येत असतो.
या बाबतीत जर कावळ्याला अन्न, पाणी, दिल्यास घरातील बाधाचें निवारण होते, धनलाभ, संकटपासून मुक्ति, शुभ -अशुभ संकेत, भविष्यत होणारे घटनाचे संकेत, कुटुंबात सुख -समृद्धि, समाधान लाभते, हे सर्व आपोआप होत नाही तर आपण करीत असलेले हातून, सागुन, केलेले कर्म हे मूळ असून तस पुण्य मिळत राहते, आणि कावळ्याला जर थोड़े अन्न किंवा काही धान्य टाकले तर आपले पूर्वज शुभ आशीर्वाद देतात, असे जूने वयस्कर सागतात.
*नाश्ता करण्यासाठी 6 वाजताच हजेरी*
कावळा हा महत्वचा पक्षी असून त्याला इतका जीव लावला तो रोज सकाळी 6 वाजता न चुकता शेटे यांच्या ग्यालरित चहा, बिस्कीटे, शेव, चपाती, पोहे, अंडे, मटन, बूंदी आवडते पदार्थ, पण पेढ़े, बर्फी, गुलाब जामुन, शिरा आवडत नाही, तो इतका शेटे कुटुंबात मिसळून गेलाय ::एखादे वेळी आला नाही की ::हुरहूर लागते.
--एस. बी. शेटे, पक्षी प्रेमी, नेवासा ( पानसनाला )सोनई.