कुणाल कामराच्या प्रतिमेला जोडे मारत राहुरीत शिवसैनिकांकडून गुन्हा दाखल करण्याची मागणी .

कुणाल कामराच्या प्रतिमेला जोडे मारत राहुरीत शिवसैनिकांकडून गुन्हा दाखल करण्याची मागणी.
कुणाला कामराने संवेदनशील उपमुख्यमंत्री शिंदे यांची माफी मागावी अन्यथा शिवसैनिक धडा शिकवतील – देवेंद्र लांबे पा.
राहुरी येथे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी एकत्रित येत स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने संवेदनशील उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षाचे मुख्यनेते एकनाथ शिंदे यांच्यावर बदनामी कारक कविता केल्यामुळे संतप्त होत कुणाल कामरा याच्या फोटोला चपला मारत राहुरी पोलीस ठाण्याचे पो.नि.संजय ठेंगे यांच्याकडे गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
यावेळ शिवसेना राहुरी तालुका प्रमुख देवेंद्र लांबे पा.म्हणाले कि, मुंबई येथे एका शोमध्ये कुणाल कामरा याने महाराष्ट्रातील राजकारणावर भाष्य केले,त्याने नाव न घेता अप्रत्यक्षपणे महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षाचे मुख्यनेते नाम.एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली.नाम.एकनाथ शिंदे यांची खिल्ली उडवतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.स्वघोषित विनोदी कलाकार कुणाल कामरा याने जाणीवपूर्वक कट रचून नियोजन करुन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नाम.एकनाथ शिंदे यांचा अपमान करण्यासाठी अपप्रचार मोहीम राबवली आहे.
कुणाल कामरा याने महाराष्ट्रातील लोकांच्या भावनांना दुखावणारं विधान केलं आहे. त्याने चुकीच्या शब्दांचा वापर केला आणि नाम.एकनाथ शिंदे यांना उद्देशून अपमानकारक अशी सूचक विधाने केली. हे कृत्य कायदेशीरदृष्ट्या गुन्हेगारी स्वरूपाचे आहे.लोकशाहीत लोकप्रतिनिधींवर विधायक टीका करणे हे मान्य आहे; परंतु जाणीवपूर्वक बदनामीकारक विधाने करणे हे कायद्याच्या चौकटी बाहेरचे आहे. अशी विधाने मग गुन्हेगारी स्वरूप धारण करतात. त्यामुळे कुणाल कामरा याच्यावर कायदेशीर कारवाई करावी,कामरा याने नाम.एकनाथ शिंदे यांची माफी न मागितल्यास शिवसैनिक धडा शिकवतील असे शिवसेना ता.प्र. श्री.देवेंद्र लांबे पा. यांनी म्हंटले आहे.
या प्रसंगी शेतकरी सेना जिल्हा प्र.राजेंद्र लोंढे,सुभाष जुंदरे,उपजिल्हा प्र.जयवंत पवार,विजय तोडमल,दादासो शिंदे, युवा सेनेचे सचिन करपे,अशोक तनपुरे,निखील भोसले,अनिल आढाव,दिपक जाधव,राजू जाधव,प्रशांत खळेकर,अरुण जाधव,महेंद्र शेळके,सुभाष शिंदे,गणेश निमसे,रोहित नालकर,उमेश कवाणे ,महेश घोरपडे,संदीप करपे,दिलीप शिंदे,ज्ञानेश्वर धसाळ,बाप्पुसाहेब काळे,बाळासाहेब जाधव,गोविंद जाधव,अँड.विजय तोडमल आदी शिवसैनिक उपस्थित होते.