श्रीरामपूर जिल्हा झालाच पाहिजे-आप चे डेंगळे. अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय श्रीरामपूर येथेच व्हावे-आपची निवेदनाद्वारे मागणी..!
.
श्रीरामपूर - महाराष्ट्र राज्यात अहमदनगर जिल्हा हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा आहे. अहमदनगर जिल्हा विभाजनाचा प्रस्ताव १९८०-८१ पासून शासनाच्या विचाराधीन असून अकोले, संगमनेर, राहाता, कोपरगाव, श्रीरामपूर, नेवासा व राहुरी या तालुक्यासाठी स्वतंत्र जिल्हा मुख्यालय श्रीरामपूर योग्य असून तशी शिफारस मंत्रिमंडळाने नेमलेल्या समितीनेही अहवालात केली आहे. श्रीरामपूर येथे आरटीओ परिवहन कार्यालय, जिल्हा न्यायालय, अप्पर पोलीस अधीक्षक, विभागीय एसटी कार्यशाळा, शहरातच रेल्वे स्टेशन, भारत सरकारचे जिल्हास्तरीय पोस्ट कार्यालय, दूरसंचार कार्यालय, पासपोर्ट कार्यालय , तसेच शेती महामंडळ ची भरपूर जागा, शिल्लक आहे,अशी सर्वात महत्वाची कार्यालये, व मुबलक जागा असताना प्रस्तावित अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय दुसरीकडे नेण्याचा घाट घातला जात आहे याचा आम्ही जाहीर निषेध करतो तसेच अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय श्रीरामपूर येथेच व्हावे
अशी मागणी आम आदमी पार्टीच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना श्रीरामपूर तहसीलदार यांच्यामार्फत निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली
श्रीरामपूर शहराच्या दुसऱ्या आराखड्यात भविष्यातील श्रीरामपूर जिल्हा मुख्यालय डोळ्यासमोर ठेवून रचना व जागांचे आरक्षण करण्यात आले आहे. अ.भू क्र ४५२ त ४५५ अ मध्ये सरकारी कार्यालये, व निवास स्थानासाठी ७.७७ हेक्टर जमीन आरक्षित ठेवण्यात आली आहे. या आरक्षणामुळे भविष्यात श्रीरामपूर जिल्हा मुख्यालय झाल्यास सरकारी कार्यालये व कर्मचारी निवासस्थानासाठी इमारती बांधण्यास ऐनवेळी जागेची शोधाशोध करावी लागणार नाही ही आधीच व्यवस्था ८०-८१ पासून शासन प्रस्तावात केली आहे.
एवढे असताना हे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय जाणून-बुजून शिर्डीत नेण्याचा घाट घातला जात आहे
काही पक्षीय नेते स्वतःच्या स्वार्थासाठी श्रीरामपूर जिल्हा होऊ नये म्हणून सर्वत्र प्रयत्न करीत आहे आम्ही या गोष्टीचा जाहीर निषेध करतो व अशा राजकीय लोकांची जागा श्रीरामपूर कर दाखवून देईल
असे यावेळेस डेंगळे म्हणाले व श्रीरामपूरच जिल्हा झाला पाहिजे अशी मागणी केली
यावेळी एडवोकेट प्रवीण जमदाडे, बी एम पवार, डॉ. सचिन थोरात,डॉ.प्रवीण राठोड, भरत डेंगळे, भैरव मोरे, अक्षय कुमावत,विकी लोंढे, आधी मोठ्या संख्येने उपस्थित होते