अहमदनगर जिल्ह्यातील बालाजी देडगाव मध्ये सहस्रचंद्रदर्शन सोहळा व तीर्थमूर्ती कृतज्ञता सन्मान सोहळा 2022 चे आयोजन.
अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे आदरणीय ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे मा.संचालक तथा दानशूर व्यक्तिमत्व बाजीराव पाटील मुंगसे (अण्णा )यांच्या सहस्त्रचंद्र दर्शन सोहळ्याचे औचित्य साधून देडगाव मधील सर्व वस्ती शाळा, गावातील शाळा यांना जमिनी दान करणाऱ्या भूमिपुत्रांचा तीर्थमूर्ती कृतज्ञता सन्मान सोहळा व जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा देडगाव मधील स्मार्ट क्लासरूमचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे.
या कार्यक्रमाचे नियोजन असे असणार आहे की, शनिवार दि.१९ रोजी सकाळी ठीक ८ वाजता बालाजी मंदिर येथे शाळेला जमीन दान देणारे शिक्षणभूषण ,सन्मानमूर्ती १२ जोड्या यांच्या हस्ते अभिषेक होइल. अभिषेक नंतर जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा देडगाव येथे मान्यवरांच्या हस्ते लोकवर्गणीतून घेतलेला स्मार्ट क्लासरूम मध्ये स्मार्ट बोर्ड चा लोकार्पण (उद्घाटन)सोहळा पार पडेल.
या दानशूर व्यक्ती व प्रमुख मान्यवर यांची गावांमधून फटाक्याच्या आतषबाजी मध्ये जंगी मिरवणूक निघणार आहे .या मिरवणुकीसाठी कैलास घोरपडे आव्हारवाडी यांचा वीरभद्र ब्रास बँड पथक च्या माध्यमातून पौराणिक सुंदर लोककला सादर करण्यात येणार आहे.
यानंतर सकाळी ठीक बरोबर दहा (१०)वाजता अहिल्याबाई होळकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे ज्येष्ठ साहित्यिक मा.खासदार यशवंतरावजी गडाख साहेब यांच्या अध्यक्षतेखाली व माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख, माजी आमदार पांडुरंग अभंग साहेब ,माजी आमदार नरेंद्र पाटील घुले, नेवासा तालुक्याचे विद्यमान सभापती रावसाहेब कांगुणे व त्रिमूर्ती शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. साहेबरावजी घाडगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बाजीराव पाटील मुंगसे (अण्णा )यांचा सहस्र चंद्रदर्शन सोहळा व दानशूर व्यक्तीचा तीर्थमूर्ती कृतज्ञता सोहळा २०२२ संपन्न होणार आहे.
तसेच या भव्य दिव्य कार्यक्रमास नेवासा तालुक्याचे उपसभापती किशोर जोजार,चांदा गट जिल्हा परिषद सदस्य सविताताई अनिलराव आडसुरे, नागेबाबा मल्टीस्टेटचे संस्थापक कडूभाऊ काळे, मुळा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन नानासाहेब तुवर,व्हाईस चेअरमन कडू पाटील कर्डिले, ऍड देसाई आबा ,मार्केट कमिटीचे सभापती डॉक्टर शिवाजी शिंदे ,खरेदी विक्री संघाचे चेअरमन प्रभाकर कोलते, पंचायत समिती सदस्य वैशालीताई एडके, गटशिक्षणाधिकारी शिवाजीराव कराड,साहेब, ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे संचालक प्राध्यापक नारायणराव म्हस्के ,मच्छिंद्र पाटील मस्के, व सर्व संचालक मुळा साखर कारखान्याचे संचालक लक्ष्मण आबा पांढरे, माजी सभापती भगवानराव गंगावणे,ग्रामपंचायत सरपंच ,उपसरपंच सर्व सदस्य, देडगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन व सर्व संचालक ,बालाजी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष व सर्व विश्वस्त, गावातील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा देडगाव व वस्तीशाळा चे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंद ,अहिल्याबाई होळकर माध्यमिक विद्यालय चे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंद ,बजरंग दल, शिवनेरी ग्रुप ,बालाजी युवा मंच ,नागेबाबा परिवार ,जय भवानी ग्रुप ,दयासागर ग्रुप ,सावता माळी ग्रुप, कैलास नाथ मित्र मंडळ , मुस्लीम संघटना,व सर्व पत्रकार, डॉक्टर, वकील, इंजिनियर, व राजकीय ,शैक्षणिक ,धार्मिक, सांस्कृतिक ,कला ,क्रीडा, साहित्य ,अध्यात्मिक ,व समस्त ग्रामस्थ देडगावकर व जिल्हाभरातून येणारे सर्व प्रतिष्ठित मान्यवर कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे.
या कार्यक्रमासाठी भूमिदान देणारे सन्मान मूर्ती असतील बाजीराव शंकरराव मुंगसे, साहेबराव रामभाऊ कदम, लक्ष्मणराव जयवंत बनसोडे ,नामदेव दशरथ तांबे ,बाबासाहेब कारभारी तांबे, सोन्याबापू बाबुराव कुटे ,द्वारकाबाई भाऊराव मुंगसे ,सुंदरदास नामदेव मुंगसे, कमलाकार त्र्यंबक गोयकर, मोतीलाल चंद्रभान आदमने, गोरक्षनाथ गंगाधर नांगरे ,विजय साहेबराव कदम ,सागर मनोहर बनसोडे यांच्या जोडिसहीत( सपत्नीक) मानाचा फेटा बांधून , सन्मान चिन्ह देण्यात येणार आहे.
कार्यक्रमासाठी माजी विद्यार्थी संघ यांनी पुढाकार घेत ग्रामस्थांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी, सर्वांनी विशेष सहकार्य करावे .व जिल्हाभरातून मान्यवरांना आमंत्रित करून जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी कारण हा जिल्ह्यातील पहिलाच आगळा वेगळा, अतीशय सुंदर कार्यक्रम होणार आहे.असे आवाहन माजी विद्यार्थी संघ यांनी केले आहे.
कार्यक्रमास माजी विद्यार्थी संघ यांनी विशेष कष्ट घेतल्याने त्यांचे नेवासा तालुक्यातून अभिनंदन व कौतुक होत आहे
.