राहुरी तालुक्यात चालतात बहुताश स्कुल बसेस बेकायदेशीर विद्यार्थ्यांच जिव धोक्यात.

राहुरी तालुक्यात चालतात बहुताश स्कुल बसेस बेकायदेशीर विद्यार्थ्यांच जिव धोक्यात.

राहुरी तालुक्यात विद्यार्थी वाहतुक करणाऱ्या अनेक गाड्या बेकायदेशीर विद्यार्थ्यांचे जीव धोक्यात

         राहुरी तालुक्यात अनेक शिक्षण संस्था कार्यरत असुन तालुक्यातील अनेक खेडेगावातून विद्यार्थी शाळेत येत आहेत या विद्यार्थ्यांना दळण वळण साठी पर्याय नसल्याचा फायदा घेत अनेक गाडी मालकांनी त्याच्या गाड्या स्कुल बस म्हणुन चालवत आहेत बऱ्याच शिक्षण संस्थानी काही गाड्यांना परवानगी दिलेली नसताना ह्या गाड्या स्कुल बस म्हणुन वापरत आहेत ह्या गाड्या वापरताना स्कुल बसचे कोणतेही निकस वापरात आणलेले दिसत नाहीत अनेक बसेसचे इसुरन्स भरलेले नाहीत नाहीत 

        तसेच आर टी ओ च्या नियमांचे कोणतेही नियम हे गाडी मालक पाळत नाहीत अनेक गाडी मालिकांनी विद्यार्थी वाहतुक करताना विद्यार्थ्याच्या सुरक्षेसाठी कोणताही उपाययोजना केलेल्या नसुन केवळ पैसा कमावाण्याच्या हेतुने ह्या

 गाड्या चालवल्या जात आहेत 

     हे स्कुल बस चालक मालक आपल्या गाडीमध्ये मोठ्या प्रमाणात विध्यार्थी भरून नेताना निदर्शनास येत आहेत

   ह्या बेकायदा विद्यार्थी वहातुक गाड्या चालवणाऱ्या चालक मालकांचे एक मोबाईल नेटवर्क असुन आर टी ओ ऑफीसचे अधिकारी गस्तीवर निघताच हे चालक मालक त्यांचे मागावर राहुन आर टी ओ ची गाडी कोणत्या मार्गावर आहे याची खबर बात एकमेकांना देऊन सावध करतात त्यामुळे सदर बेकायदेशीर चालवणारे स्कुल बस चालक आपल्या गाड्या आर टी ओ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास येण्या पुर्विच गायब करत असल्याने आर टीओ अधिकाऱ्याकडून अशा वाहाणावर कारवाई होत नाही 

  शाळा चालकानी अशा वाहनांची वेळोवेळी तपासणी करून स्कुल बस सेवेचे निकस पुर्ण करत असलेल्याच गाडयांना ना हरकत प्रमाणपत्र देऊन त्याच गाड्या स्कुल बस म्हणुन वापरण्याची मुभा द्यावी तसेच विद्यार्थ्याच्या सुरक्षेची दक्षता घ्यावी तसेच आर टी ओ अधिकाऱ्यांनी वेळोवेळी जाऊन ह्या वाहनांची तपासणी करावी जि वाहने स्कुल बस सेवेचे तसेच आर टी ओ नियमांचे पालन करत नाहीत ज्या गाड्याची इन्सुरंन्स प्रक्रीया पुर्ण नाही तसेच ज्या गाड्याचे रजिट्रेशन संपुष्टात आले आहेत अशी वाहने बरखास्त करावीत व विद्यार्थ्यांचे संरक्षण जपावे अशी पालक वर्गातून मागणी होत आहे.