वाघोली गावातील मागील वर्षाचे अतिवृष्टीचे पंचनामे होऊन देखील ग्रामसेवक .तलाठी .कृषी सहाय्यक. यांच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांना अनुदानापासून वंचित राहावे लागत आहे

वाघोली गावातील मागील वर्षाचे अतिवृष्टीचे पंचनामे होऊन देखील ग्रामसेवक .तलाठी .कृषी सहाय्यक. यांच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांना अनुदानापासून वंचित राहावे लागत आहे

वाघोली गावातील मागील वर्षीचे अतिवृष्टीचे पंचनामे होऊनही ग्रामसेवक. तलाठी. कृषी सहाय्यक. यांनी कर्तव्यात कसूर केल्यामुळे अनुदान मिळले नाही त्याबाबत निवेदन.

यशवंत पाटेकर 

जिल्हा प्रतिनिधी,अहमदनगर 

शेवगाव :आज दिनांक 31 रोजी शेवगाव तालुक्यातील वाघोली येथील मागील वर्षी 2022 झालेल्या अतिवृष्टीचे सरसकट पंचनामे होऊन देखील आजपर्यंत सरकारी अनुदान मिळाले नाही.त्यासाठी आज शेवगावचे प्रशिक्षणार्थी तहसीलदार श्री राहुल गुरव साहेब यांना जनशक्ती व राष्ट्रवादीच्या वतीने निवेदन देण्यात आले.मागील वर्षी सन 2022 मध्ये शेवगाव तालुक्यात भरपूर पाऊस झाला होता.त्याच प्रमाणात वाघोली ता.शेवगाव येथेही पाऊस पडला होता.त्या पावसामुळे वाघोली गावातील सर्व शेतकऱ्यांच्या पिकाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.शासनाच्या आदेशानुसार गावातील सर्व शेतकऱ्यांच्या सर्व पिकांचे नुकसान झाल्यामुळे सरसकट पंचनामे करण्यात आले होते.त्या पंचनाम्यानुसार शेतकऱ्यांच्या याद्याही करण्यात आल्या. परंतु त्यातील काहीं शेतकऱयांना अतिवृष्टी अनुदान देण्यात आले.व काही शेतकऱ्यांना अनुदान मिळाले नाही.त्यामुळे आज वाघोली येथील अनुदापासून वंचित शेतकऱ्यानी तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यात आले.त्यानुसार तहसीलदार साहेब यांनी तत्परता दाखवत संबंधित गावच्या अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता अनुदानापासून वंचित शेतकऱयाच्या याद्याच अधिकाऱ्याकडून प्राप्त झाल्या नसल्याचे लक्षात आणून दिले तसेच संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून दोन दिवसात राहिलेल्या याद्या तयार करून पाठवा असे आदेश दिले.गावातील जवळपास 300 शेतकरी या अनुदानापासून वंचित राहिले.असून मा.तहसीलदार साहेब यांनी चौकशी करून आम्हा शेतकऱ्यांना लवकरात लवकर अनुदान देण्याची मागणी करण्यात आली.अन्यथा आम्ही सर्व अनुदानापासून वंचित राहिलेले शेतकरी दहा दिवससात उपोषणाला बसणार आहोत.याची प्रशासनाने नोंद घ्यावी.यावेळी निवेदन देताना देवदान आल्हाट,वैभव भालसिंग, गणेश शिरसाट,विजय तनपुरे,राहुल मोरे सह इतर शेतकरी उपस्थित होते. तसेच अतिवृष्टी अनुदानापासून वंचित ठेवणाऱ्या ग्रामसेवक व तलाठी,कृषी सहाय्यक यांची चौकशी करून त्यांच्यावर कर्तव्यात कसूर केल्याबद्दल योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी तहसीलदार साहेब यांना अतिवृष्टी अनुदानापासून वंचित शेतकऱ्याकडून करण्यात आली.