कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी लसुन मिरची कोथिंबीर अवघा झाला माझा हरी !! या युक्तीप्रमाणे सलाबतपुर (गोपाळनाथ) येथे श्री संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथी सोहळा सर्वांनी एकत्र येत मोठ्या थाटामाटात केला साजरा.....

कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी लसुन मिरची कोथिंबीर अवघा झाला माझा हरी !! या युक्तीप्रमाणे सलाबतपुर (गोपाळनाथ) येथे श्री संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथी सोहळा  सर्वांनी एकत्र येत मोठ्या थाटामाटात केला साजरा.....

कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी लसूण मिरची कोथिंबीर अवघा झाला माझा हरी या अभंगा प्रमाणे आज नेवासा तालुक्यातील सलाबतपुर येथे श्री संत शिरोमणी सावता महाराज यांच पुण्यतिथी सोहळा सलाबपूर मध्ये सर्व जाती धर्मातील लोक एकत्र येऊन मोठ्या थाटामाटात संपन्न...... या वेळी ह.भ.प काळे महाराज म्हणाले की आज माता पित्यास धन्यता देणारा किर्तन सेवेसाठी सावता महाराजांचा अभंग निवडलेला आहे...... त्यावेळी ह.भ.प चांगदेव काळे महाराज बोलताना म्हणाले की संतांना एखाद्या जातीमध्ये त्यांना कुणीही बसू नये आज सर्व जाती धर्माचा समाज आज सावता महाराज जयंतीच्या निमित्ताने सलाबतपुर येथे एकत्र आला आहे. यावेळी काळे महाराज म्हणाले की संतांचा पुण्यस्मरण केले नाही तर संतांचे काही बिघडत नाही परंतु आपले नक्कीच बिघडते......... यावेळी ह.भ.प काळे महाराजांनी आपल्या कीर्तनातून अनेक संत शिरोमणी सावता महाराजांच्या जिवन चरित्रावरती उदाहरणे देत कीर्तन सेवा संपन्न केली...... हा पुण्यतिथी सोहळा सलाबतपुर येथील विठ्ठल-रुक्मिणी माता मंदिर मध्ये संपन्न झाले. यावेळी भजनाची सात आनंद गोपालनाथ भजनी मंडळ सलाबतपुर( गोपाळनाथ नगर) गोगलगाव भजनी मंडळ, दिघी भजनी मंडळ, बाभुळखेडे भजनी मंडळ, गोंडेगाव भजनी मंडळ, गेवराई भजनी मंडळ ,तसेच सलाबतपूर व सलाबतपुर परिसरातील भजनी मंडळाने कीर्तनात सात संगत केली.......... तसेच यावेळी सलाबतपुर गावांमधून संत सावता महाराज यांच्या प्रतिमेची मोठ्या थाटामाटा मध्ये मिरवणूक करण्यात आली. तसेच या वेळी शिवतीर्थ उद्योग समूहाचे प्रमुख(संचालक) दत्तात्रेय गंगाधर नांगरे यांच्या वतीने महाप्रसादाचे अन्नदान करण्यात आले....