सावनेर येथील कु.अबोली विरखरे यांची इंग्लंडमध्ये एमएससी अभ्यासक्रमासाठी निवड झाली .
1.
सावनेर येथील कु.अबोली विरखरे यांची इंग्लंडमध्ये एमएससी अभ्यासक्रमासाठी निवड झाली
बीपीएस न्यूज नेटवर्क :
सावनेर : येथील सारस्वत सीबीएसई पब्लिक शाळाचे संचालक प्रा. साहेबराव विरखरे यांची कन्या अबोली विरखरे या मुलीची इंग्लंडमधील शिफिल्ड विद्यापीठात एमएससी अभ्यासक्रमासाठी निवड झाली आहे.
विरखरे लॉनमध्ये नुकताच कु.अबोलीचा निरोप समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी आमदार केदार गटाचे ज्येष्ठ नेते व अधिवक्ता श्रीकांत पांडे होते . ह्या प्रसंगी अधिवक्ता रामू धोटे , प्रमोद खुरसुंगे , मनोज बसवार, रामभाऊ उमाटे, सुधाकर बागडे, आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कु.अबोली यांचे बारावी पर्यंतचा अभ्यास सारस्वत पब्लिक शाळामध्ये झालेलं आहे त्यानंतर समोरचा अभ्यास कु. अबोली यांनी पोस्ट मास्टर्स इन डेटा अॅनालिटिक्स (संगणक विज्ञान) डीवाय पाटील महाविद्यालय पुणे येथील पूर्ण केले . मंचावर उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणात अबोली व विरखरे कुटुंबीयांच्या शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचे कौतुक करून अबोलीला अनेक शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे संचालन डॉ. साची बागडे व प्रास्ताविक आशिष विरखरे आणि आभार प्रदर्शन साकेत विरखरे यांनी केले.
निरोप समारंभाला यशस्वी करण्या करिता सुधाकर विरखरे, नरेंद्र विरखरे, राजेंद्र विरखरे, बाबा बुरान, उमेश राऊत, प्रशांत ठाकरे, अभिषेक विरखरे, राजेंद्र वानखडे, अधिवक्ता, डॉक्टर , व्यापारी संघटना, पत्रकार, विविध पक्षांचे नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बीपीएस लाइव न्यूज तर्फे कु. अबोली विरखरे यांना पुढील वाटचाली करीता हार्दिक शुभेच्छा .