रक्तदानामुळे प्रत्येक वर्षी अनेकांना जीवनदान मिळते.

रक्तदानामुळे प्रत्येक वर्षी अनेकांना जीवनदान मिळते.        बी.पी.एस राष्ट्रीय लाईव्ह न्यूज दिल्ली                              सावनेर :-येथे आज दिनांक 20/9/2022 रोजी संव ग्रुप सावनेर आणि हितज्योती आधार फाउंडेशनचा वतीने 50 लोकांनी रक्तदान केले अपघातात झालेला अतिरिक्त रक्तस्राव, पॅलेसोमिया, रक्तक्षय, रक्ताचा कर्करोग, प्रसूतिपश्चात रक्तस्राव, शस्रक्रिया आणि इतर गंभीर आजारांमधे योग्यवेळी रुग्णाला रक्त मिळाले नाही तर

तो रुग्ण दगावण्याची शक्यता असते. अशावेळी एका मानवाचेच रक्त दुसऱ्या मानवाचे प्राण वाचवू शकते. कारण मानवाचे रक्त कोणत्याही कारखान्यात तयार होत नाही व दुसऱ्या कोणत्याही प्राण्याचे रक्त मानवासाठी उपयोगात येऊ शकत नाही, त्यामुळे रक्तदानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे, रक्तदानामुळे प्रत्येक वर्षी अनेकांना जीवनदान मिळते. अनेक मोठ्या सर्जरींमध्ये किंवा गंभीर परिस्थितीत रक्तदानामुळे पेशंटचे प्राण वाचण्यास मदत होते. तसेच गरोदरपणात बाळाचे आणि आईचे प्राण वाचण्यास रक्तदान महत्त्वाचे कार्य करते. रक्त न मिळाल्यामुळे मृत्यूचे प्रमाण देशभरात १५ ते २० टक्के आहे. भारतात केवळ ०.६ टक्के लोक रक्तदान करतात ज्योती हितेश बनसोड : समाजाचे ऋण फेडायची ही एक संधी रक्तदानामुळे मिळते, मनी असेल मानवसेवेचा भाव, तर रक्तदानासारखा दुसरा नाही उपाय. प्रत्येक महीलांनी रक्तदान नक्की करावे अमन ब्लड बँक नागपूर ने सर्वांचे आभार मानले यावेळी ज्योती हितेश बनसोड, सचिन आठवले,फ़ॉरेस्ट रेंजर ऑफिसर, मकसूद शेख उमेश मानकर, मोनेश तिबोले, संकेत गमे, सौरभ साबळे, प्रफुल भागवत, स्वप्नील बोडे, अजय भुरके, शुभम सुपारे, प्रज्वल छल्लाखेडे,प्रवीण राऊत, आदींनी रक्तदान करून सहकार्य केले