*सोलापुरात 27 जून पर्यंत जमावबंदी*

बी पी एस राष्ट्रीय लाईव्ह न्युज

जिल्हा प्रतिनिधी- सम्मेद तरटे

सोलापूर-दि.13-06-2022       सध्याच्या परिस्थितीत जास्त प्रमाणात

जयंती, धार्मिक, सण-उत्सव आहेत त्यामुळे सोलापूर शहरात गर्दी

होण्याची शक्यता आहे. तसेच आंदोलने संप असे वेगवेगळे

निदर्शने होत असतात. यामध्ये ओबीसी आरक्षण, मराठा आरक्षण,

धार्मिक स्थळावरील भोंगे आगामी निवडणुका यातून कायदा व

सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे

शहरात 13 ते 27 जून या कालावधीत 5 पेक्षा जास्त व्यक्ती

एकत्र गोळा झाल्यास अथवा फिरल्यास त्यांच्यावर कडक निर्बंध

घालण्यात येणार आहेत. यामध्ये लग्नसमारंभासाठी व

अंत्ययात्रेसाठी निर्बंध असणार नाहीत. पण मोर्चा, आंदोलने,

सभा अशा प्रकारच्या जमावास निर्बंध असणार आहेत. तसेच

कसल्याही प्रकारचे शस्त्र बाळगण्यास परवानगी नसणार आहे.

असे आदेश पोलिस उपायुक्त श्री बापू बांगर यांनी रविवारी काढले

आहेत.

याची सोलापूर शहरातील सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी.