*भीमा नदीवर "वीस रस्ते" तसेच पालखी साठी तळ पण करणार एक हजार कोटींचा निधी पंढरपूरसाठी : जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर*

बी पी एस राष्ट्रीय लाईव्ह न्यूज मीडिया
जिल्हा प्रतिनिधी: सम्मेद तरटे
सोलापूर- पंढरपूर शहरात विठू माऊलीच्या नगरीत दर्शनाकरता लोकसंख्येचा प्रभाव वाढल्यामुळे तसेच नगरीत येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता नवीन आराखडा तयार करण्यात येत आहे. पंढरपूर शहरात नव्याने वीस रस्ते पालखी साठी वेगळी झाला दुमाला ते गोपाळपूर नवीन सिमेंट पूल तसेच नदीच्या आजूबाजूचे व किनाऱ्याचे स्वच्छतेकरण करण्याच्या निर्णय यामध्ये घेतलेला आहे. यामध्ये मंदिर समितीचे अध्यक्ष वारकरी यांच्या आवश्यक कामाच्या सूचना घेऊन करण्यात येणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या यांनी बैठक घेऊन विकास आराखडा सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
पंढरपूर मध्ये जवळजवळ तीन लाख लोकांची जनसंख्या असताना वारीच्या निमित्ताने एका वर्षात 38 लाखापेक्षा जास्त वारकरी दर्शनाला येत असतात. वारीच्या काळात प्रशासनातून उपाययोजना अपुऱ्या पडतात पण अशा प्रकारचे रस्ते व सुविधा केल्यास त्यांना अडचण येणार नाही व सर्व सुख सोयी लाभल्या जातील व गर्दी पण नियंत्रणामध्ये येईल त्या दृष्टिकोनाने आराखडा तयार करण्यात येत आहे असे वक्तव्य शंभरकर यांनी केले.
शेगाव दुमाला ते गोपाळपूर या ठिकाणी नवीन पूल तयार करण्यात येणार आहे त्यासाठी भाविकांना या पुलाचा अतिशय चांगल्या प्रकारे वापर करता येईल व गर्दीचा धोकाही कमी होईल यामुळे विठू नगरीत आलेल्या सर्व भाविकांची सुख सोय सुविधा चांगली होईल व पंढरपूरचे सुशोभीकरण वाढेल असेही सोलापूर जिल्हाधिकारी शंभरकर म्हणाले.