जगदगुरू संत तुकाराम महाराज यांच्या अभंगाचा वापर करून वादग्रस्त लिखाण केल्याबद्दल अभिनेत्री केतकी चितळे विरोधात गुन्हा दाखल
प्रतिनिधी दि १५ -जगदगुरू संत तुकाराम महाराज हे वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान आहे. संत तुकाराम महाराजांनी अनेक अभंग लिहिले आहे व त्यात तुका म्हणे ,असा उल्लेख केला आहे ती संत तुकाराम महाराजांची नाममुद्रा असून त्यावर महाराजांनी लिहिलेल्या सर्व अभंगांची स्वाक्षरी आहे परंतू काल केतकी चितळे यांनी तुका म्हणे,या शब्दाचा वापर करून वादग्रस्त विधान केले आहे.या विधानामुळे पूर्ण वारकरी संप्रदायाची मन दुखवली आहेत.म्हणून केतकी चितळे विरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी संत तुकाराम महाराज संस्थान च्या वतीने करण्यात आली