अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून जीवे मारले. यासंदर्भात शेवगाव येथे जाहीर निषेध.
*हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेचा शेवगावात जाहीर निषेध*
*अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून जीवे मारले देहरे, ता-नगर जि-अहमदनगर येथील साक्षी पिटेकर या अल्पवयीन मुलीच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे.या मागणीसाठी शेवगावच्या क्रांती चौकात आंदोलन.
दिनांक 06/02/3024 मंगळवार
या बाबत सविस्तर वृत्त असे की मयत साक्षी पिटेकर हि ई. 8 वीत शिकत असलेली अल्पवयीन मुलगी आपली विधवा आई व लहान भाऊ असे तिघे मिळुन देहेरे येथे रहात होती. दिनांक 13 जानेवारी 2024 रोजी दुपारी 4 च्या दरम्यान तीला घरा जवळुन प्रिती बाबा जाधव हिने मारहाण करत घेवुन गेलेली आहे. पुढे 16 जानेवारी 2024 ला तीची देहेरे येथील विहिरीत मृतदेह स्वरुपात आढळून आला आहे. या मधल्या काळात आरोपींनी तिच्यावर लैंगिक हत्याचार करून तिला मारून टाकून पिकअप गाडी मध्ये घालून घेऊन गेले व विहिरीत फेकून दिलेले आहे. तीचा निर्दयीपणे खून केलेला आहे. या घटनेमुळे साक्षी पिटेकरचे कुटुंब/नातेवाईक व आसपासचे रहिवासी तसेच वडार समाज बंधू भगिनी खूप दहशतीखाली आलेले आहे. ही घटना येथील पोलिसांनी अतिशय बेजबाबदारपणे व कर्तव्यात कसूरकरून निष्काळजी पणे हाताळलेली आहे. वेळीच ही घटना कर्तव्यदक्ष पणे हाताळली गेली असती तर साक्षीचा मृत्यू झाला नसता, अशी आमची भावना झालेली आहे.
या घटनेमुळे जिल्ह्यासह महाराष्ट्रातील समाजाच्या मनामध्ये आरोपी नराधमाच्या विरुद्ध व आरोपींना पाठीशी घालणाऱ्या पोलीसांच्या विरुद्ध प्रचंड चीड निर्माण झालेली आहे.
ही बाब अतिशय गंभीर आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक साहेब अहमदनगर घटनेमध्ये सहभागी असलेल्या सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी. साक्षीच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या आरोपींवर फास्ट ट्रेक कोर्ट मध्ये केस चालउन कठोरात कठोर फाशीची शिक्षा व्हावी ही तमाम महाराष्ट्रातील समाज बांधवांची भावना आहे. साक्षी पिटेकर व तिच्या कुटुंबाला न्याय न मिळाल्यास हे आंदोलन महाराष्ट्रभर तीव्र स्वरूपात केले जाईल याची आपण नोंद घ्यावी. यावेळी आंदोलना दरम्यान पुढील मागण्या प्रामुख्याने करण्यात आल्या आहेत साक्षी पिटेकर हिच्यावर लैंगिक हत्याचारकरून मारून टाकणाऱ्या ऋतिक संजय जाधव या नराधमाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे या हत्याकांडातील एक आरोपी प्रीती बाबा जाधव हिला त्वरित अटक करण्यात यावी.या हत्याकांडतील ईतर सर्व आरोपींना अटक करून फाशीची शिक्षा झाली पाहिजे..
साक्षी पिटेकरच्या मारेकऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या संबंधित अधिकाऱ्याला बडतर्फ करून त्याला सह.आरोपी करण्यात यावे. प्रीती बाबा जाधव या आरोपीचीची नार्को टेस्ट करण्यात यावी. ऋत्विक संजय जाधव या नराधाम आरोपीची काॅल व मोबाईल रेकॉर्डची चौकशी करण्यात यावी. या घटनेतील पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींना या घटनेत सह.आरोपी करण्यात यावेत.साक्षी पेटकर हिच्या कुटुंबीयांच्या जीविताला धोका असल्याने या कुटुंबाला पोलीस संरक्षण देण्यात यावे.साक्षी पिटेकर हिच्या मृत्यूस देहरे गावातील अवैध धंदे जबाबदार आहेत. अशा अवैध धंद्यांना अभय देणाऱ्या अधिकाऱ्यांनवर कार्यवाही करण्यात यावी.साक्षी पिटेकर च्या कुटुंबाला भविष्यात आरोपींकडून व आरोपीच्या कुटुंबीयाकडून काही जीवित हानी किंवा मारहाण झाल्यास सदरील घटनेस सर्वस्वी जबाबदार आरोपी , आरोपीचे कुटुंबीय व प्रशासन राहील.
साक्षी पिटेकरच्या सर्व मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देऊन तिच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा ही तमाम महाराष्ट्रातील समाज बांधवांनी मागणी केली आहे संदिपदादा कुसळकर - वडार सक्षम फाउंडेशन महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक
कु. संगीताताई पवार - वडार जन आंदोलन महाराष्ट्र राज्य
हरीषजी बंडिवडार
अशोकजी पवार
रमेशजी जेठे - शिर्डी एक्सप्रेस पत्रकार अहमदनगर
बापूराव धनवडे
दिलीप सुपारे
राजूभाऊ धनवडे - वडार सक्षम फाउंडेशन महाराष्ट्र राज्य शेवगाव तालुकाध्यक्ष
गोपाल कुसळकर - वडार सक्षम फाउंडेशन महाराष्ट्र राज्य शेवगाव शहराध्यक्ष
सागर फडके नगरसेवक
बंडू रासने
संजय नांगरे
विष्णू घनवट- सरपंच बाबुळगाव
अशुतोष डहाळे- शिवसेना तालुकाध्यक्ष
व सर्व समाज बांधव शेवगावउपस्थित होते