*बार्शी तालुक्यातील कासारवाडी गावचे विर जवान विठ्ठल खांडेकर यांना जम्मू-काश्मीर येथे वीरमरण*
बी पी एस राष्ट्रीय लाईव्ह न्युज सोलापूर
जिल्हा प्रतिनिधी- सम्मेद तरटे (बळेवाडी)
बार्शी -(ता.बार्शी). कासारवाडी गावचे सी आर पी एफ मधील वीर सुपुत्र विठ्ठल रामा खांडेकर (वय 40) यांना देश सेवा करीत असताना वीर मरण प्राप्त झाले.
दि.01-04 रोजी जम्मू येथील सराव करीत असताना हृदयविकाराने दुर्घटना घडली. या घटनेमुळे कासारवाडी गावात पूर्ण बार्शी तालुक्यात सर्वत्र शोककळा पसरली. खांडेकर हे सीआरपीएफ दलातील गेल्या चार वर्षापासून देशसेवा करीत होते. सध्या हे जम्मू येथील सीमेवर देशसेवा करत होते त्यांच्या देश सेवेचे अद्याप अजून एक वर्ष शिल्लक होते. सकाळी सराव करीत असताना अचानक मैदानावर चक्कर आली तेथील जवानांनी त्यांना ताबडतोब उपचारासाठी दवाखान्यात नेले असता उपचारापूर्वीच त्यांना हृदयविकाराने वीर मरण आले त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले. या घटनेची माहिती त्यांच्या कार्यालयाच्य अधिकाऱ्याकडून त्यांच्या कुटुंबीयांना व नातेवाईक यांना कळविण्यात आली.
शुक्रवारी रात्री जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी कासरवाडी मध्ये येऊन त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले.
राज्य शासन खांडेकर कुटुंबियांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहे शासनाकडून त्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल असे आश्वासन पालकमंत्री भरणे यांनी दिले.
मृतदेह शुक्रवारी उशिरा जम्मू येथून पुणे येथे रवाना करण्यात आले व तेथून मृतदेह खांडेकर यांच्या गावी सकाळी 10:00वा. कासारवाडी येथे आणण्यात आले. कासारवाडीतील सर्व नागरिकांच्या, माय-भगिनींच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत होत्या. त्यांच्या राहत्या घरी देह आणल्यानंतर पूर्ण कासारवाडी, बळेवाडी, कव्हे, कोरफळे व इतर गावातील नागरिकांनी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले.
त्यांच्यावर अंत्यसंस्कार सकाळी 11:25मी. त्यांना मुखाग्नी देण्यात आली. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, भाऊ, भावजय, चार बहिणी असा परिवार आहे.