शेतकऱ्यांना 18 हजार 640 कोटी प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या हस्तांतरण सोहळ्याचे प्रक्षेपण कृषि विद्यापीठात संपन्न*

शेतकऱ्यांना 18 हजार 640 कोटी प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या हस्तांतरण सोहळ्याचे प्रक्षेपण कृषि विद्यापीठात संपन्न*

**शेतकऱ्यांना 18 हजार 640 कोटी प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या हस्तांतरण सोहळ्याचे प्रक्षेपण कृषि विद्यापीठात संपन्न*

*राहुरी विद्यापीठ, दि. 14 मार्च, 2026*

राहुरी ता प्रति - देवेंद्र शिंदे

            आसाम येथील गुवाहाटी, खानापारा, ज्योती बीष्णू अंतरराष्ट्रीय सांस्कृतिक केंद्र येथून देशातील नऊ कोटींपेक्षा जास्त शेतकऱ्यांना 18,640 कोटी रुपयांचा पंतप्रधान किसान सन्माननिधी योजनेचा 22 वा हप्ता पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी वितरित केला. महात्मा फुले कृषि विद्यापीठाचेे कुलगुरु डॉ. विलास खर्चे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विस्तार शिक्षण संचालक डॉॅ. गोरक्ष ससाणे यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचे ऑनलाईन प्रक्षेपण विद्यापीठात विद्यार्थी आणि शास्त्रज्ञांसाठी करण्यात आले. 

        याप्रसंगी कृषि तंत्रज्ञान शिक्षणाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. विजू अमोलिक, पशुविज्ञान व दुग्धशास्त्र विभाग प्रमुख डॉ. दिनकर कांबळे, मृदाशास्त्र विभाग प्रमुख डॉ. भीमराव कांबळे, वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सुरेश दोडके, वनस्पती रोगशास्त्र व कृषी अणूजीवशास्त्र विभाग प्रमुख डॉ. रवींद्र गायकवाड, जैवतंत्रज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. विवेक चिमोटे,  सेंद्रिय शेती प्रकल्पाचे प्रमुख डॉ. उल्हास सुर्वे, कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राचे प्रमुख डॉ. पंडित खर्डे, इतर शास्त्रज्ञ, कर्मचारी तसेच विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.