जल जीवन मिशन योजनेअंतर्गत नळ पाणीपुरवठा व देखभाल दुरुस्ती प्रशिक्षणा दरम्यान प्रशिक्षकांकडून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना दमबाजी ,श्रीरामपूर मध्ये खळबळ,ग्रामपंचायत कर्मचारी संघटना आक्रमक.
श्रीरामपूर तालुक्यामध्ये खळबळ उडवून देणारा प्रकार नुकताच समोर आला असूनग्रामपंचायत कर्मचारी व संघटना आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे .सदर घटनेचा वृत्तांत असा की श्रीरामपूर शहरांमध्ये जल जीवन मिशन योजनेअंतर्गत नळ पाणीपुरवठा व देखभाल दुरुस्ती साठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला होता .या प्रशिक्षणा दरम्यान प्रशिक्षक संजय साळवे यांनी सारसनगर विभागामध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना अपमानास्पद वागणूक देऊन दमबाजी केली . जल जीवन मिशन योजने अंतर्गत नळपाणी पुरवठा व देखभाल दुरुस्ती प्रशिक्षणादरम्यान दि. ११/०३/२०२४ रोजी प्रशिक्षकाकडुन प्रशिक्षणार्थी ( ग्रामपंचायत कर्मचारी) यांना झालेल्या दमबाजी तसेच अपमानास्पद वागणूक मिळाल्यामुळे या घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी दि. १२/०३/२०२४ रोजी सकाळी ठिक - ११:३० वाजता महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटना अंतर्गत श्रीरामपूर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन श्रीरामपूर पंचायत समिती परिसरामध्ये सुमारे अर्धा तास घोषणाबाजी करुन परिसर दणाणून टाकला .
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या घोषणांनी पंचायत समितीतील गटविकास अधिकारी व सर्व कर्मचारी बाहेर आले .उपस्थित कर्मचाऱ्यांनी आपल्यावर झालेला अन्याय पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना सांगून संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी करून गटविकास अधिकारी शिनारे यांना निवेदनही दिले .
श्रीरामपूर शहर पोलिस स्टेशन येथे पोलिस निरीक्षक यांना देखील निवेदन देण्यात आले . सदर निवेदनातील मागणीनुसार सबंधितावर कुठलिही कारवाई न झाल्यास दि. २२/०३/२०२४ रोजी पंचायत समिती श्रीरामपूर कार्यालय आवारात आमरण उपोषणाचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला. त्याप्रसंगी श्रीरामपूर तालुकाध्यक्ष दादासाहेब चक्रनारायण , उपाध्यक्ष दत्तात्रय बेलकर सचिव मनोज घोडके व बहुसंख्य कर्मचारी बंधु भगिनी उपस्थित होते.