अनिल कल्हापुरे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल पिंप्री अवघड ग्रामस्थांनी केला सन्मान .
अनिल कल्हापुरे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल पिंप्री अवघड ग्रामस्थांकडून सत्कार संपन्न.

पिंप्री अवघड जिल्हा परिषद शाळेचे उपक्रमशील शिक्षक श्री.अनिल कल्हापुरे यांना अहिल्यानगर जिल्हा परिषदेचा सन 2023 चा आदर्श शिक्षक पुरस्कार 5 सप्टेंबर 2025 रोजी महाराष्ट्र विधानपरिषदेचे सन्माननीय सभापती प्राध्यापक श्री.राम शिंदे साहेब यांच्या शुभहस्ते व महाराष्ट्र राज्याचे जलसंपदामंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत अहिल्यानगर येथे समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला. 2023 साली संपूर्ण राहुरी तालुक्यातून आदर्श शिक्षक मिळालेले ते एकमेव शिक्षक आहेत.
अनिल कल्हापुरे हे उच्च विद्या विभूषित प्राथमिक शिक्षक असून त्यांचे शिक्षण MA,DED,BED,SET परीक्षा उत्तीर्ण झालेले आहे. यापूर्वी आपल्या 30 वर्षांच्या सेवा काळात उत्कृष्ट शैक्षणिक कामाबद्दल अनिल कल्हापुरे यांना पंचायत समिती राहुरीचा 2022-2023 चा गुणवंत शिक्षक पुरस्कार, 2022-2023 चा अमन फाऊंडेशन राहूरीचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेला आहे. आणि त्यात आता अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या आदर्श शिक्षक पुरस्काराने त्यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
आपल्या सेवा काळात अनिल कल्हापुरे यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी विविध उपक्रम राबविले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने अहिल्यानगर जिल्हा परिषदेचा we Learn English हा उपक्रम सलग 6 वर्षापासून राबविला.कोरोना काळात इयत्ता 2 रीच्या विद्यार्थ्यांसाठी पूर्वतयारी पुस्तिका तयार करून प्रकाशित केली. त्याचा लाभ शाळेतील विद्यार्थ्यांबरोबरच संपूर्ण जिल्ह्य़ातील विद्यार्थ्यांना झाला. त्यांचे आत्तापर्यंत तीन वेळा शिष्यवृत्ती परीक्षेत एकूण ५ विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले आहेत.जिल्हा परिषदेच्या मिशन आपुलकी उपक्रमांतर्गत शाळेसाठी मोठा लोकसहभाग, इस्रो सहल विद्यार्थी निवड, दरवर्षी शालेय शैक्षणिक सहल, कुटुंब सर्वेक्षण, विविध गुणदर्शन, विज्ञान प्रदर्शन आदी उपक्रमात त्यांनी खूप मोठे योगदान दिले आहे.
अनिल कल्हापुरे यांना अहिल्यानगर जिल्हा परिषदेचा सन 2023 आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल पिंप्री अवघड ग्रामस्थांकडून त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी अनिल कल्हापुरे यांचा ग्रामस्थांकडून भव्य सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच तथा प्रहार संघटनेचे राहुरी तालुका अध्यक्ष श्री.सुरेश पाटील लांबे होते. याप्रसंगी पिंप्री अवघड ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सरपंच सौ.मिनाक्षीताई सुरेश लांबे, उपसरपंच बापूसाहेब तमनर, पिंप्री अवघड सोसायटीचे चेअरमन मच्छिंद्र पाटील लांबे, पिंप्री अवघड शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जालिंदर पवार, उपाध्यक्ष सौ.सुवर्णा ललित गायकवाड तसेच ग्रामपंचायत सदस्य शिवाजी लांबे, परविनबानो बादशाह शेख, राहुरी खुर्दचे कामगार तलाठी तुषार काळे, ग्रामपंचायत ग्रामसेवक श्रीम.चोखर मॅडम, माजी सरपंच अनिल दोंड,बादशहाभाई शेख,रमेश दोंड,अरुण लांबे,महेंद्र लांबे,सुरेश (गोपी) लांबे,अंतवान गायकवाड,राजू लांबे,सोपान लांबे, एकनाथ लांबे,दादासाहेब लांबे,दगडू शेख,राजेंद्र लांबे,बाबासाहेब विरकर, चंद्रकला लांबे, अश्विनी लांबे, योगिता लांबे शकुंतला गायकवाड, पिंप्री अवघड शाळेचे मुख्याध्यापक गंगाधर जवरे व शिक्षक सर्वश्री.मच्छिंद्र नागटिळक, कल्पना मेहेत्रे,शिवाजी नवाळे,अर्चना पोटघन,शिवाजी कुलट, अनिल पवार, संगिता बेदरे, ज्योती पुरी,छाया पानसरे आदी उपस्थित होते.
कार्यक्रम प्रसंगी उपसरपंच बापूसाहेब तमनर, कामगार तलाठी तुषार काळे, शिवाजी नवाळे, अर्चना पोटघन मॅडम व अध्यक्ष सुरेश पाटील लांबे आणि सत्कारमूर्ती अनिल कल्हापुरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक गंगाधर जवरे यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन अनिल पवार यांनी केले व आभार मच्छिंद्र नागटिळक यांनी मानले.








