चांदा परिसरातून 25 वर्षीय तरुणाचे अपहरण ; अपहृत तरुणाचा मृतदेह मुळा उजवा कालव्यात आढळल्याने खळबळ .
चांदा परिसरातून २५ वर्षीय तरुणाचे अपहरण. दोन दिवसांनी अपहृत तरुणाचा मृतदेह मुळा उजव्या कालव्यात आढळला. ; सोनई पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

चांदा परिसरातील थोरात वस्ती येथून २५ वर्षीय तरुणाचे अज्ञात व्यक्तीने फसवणूक करून अपहरण केल्याची घटना मंगळवारी (दि. २७ ऑक्टोबर) सकाळी सुमारे नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सोमणाथ रामदास थोरात (वय २५, रा. थोरात वस्ती, चांदा, ता. नेवासा) यांचे अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी फसवणूक करून अपहरण केल्याची फिर्याद संगीता रामदास थोरात यांनी दिली आहे.
या फिर्यादीवरून सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४६१/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम १४०(३) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. अपहरण झालेल्या तरुणाचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू असताना दि. २८ रोजी संबंधित व्यक्ती गावातील मुळा उजव्या कालव्यात मृत अवस्थेत मिळुन आली.या प्रकारामुळे गावात वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले आहे. ही घटना नेमके आत्महत्या की हत्या याचा शोध सोनई पोलीस घेत आहेत.
या प्रकरणाचा पुढील तपास सोनई पोलीस ठाण्याचे पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार मच्छिंद्र आडकित्ते हे करत आहेत, घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, पोलीस तपासानंतर अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.








