दरडगाव या गावांमध्ये चाळीस वर्ष महिलेचा ,राहत्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला

दरडगाव  या गावांमध्ये चाळीस वर्ष महिलेचा ,राहत्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला

राहुरी प्रतिनिधी, 

१५ दिवसापूर्वी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेल्या ४० वर्षीय महिलेचा दि. १३ मार्च रोजी दुपारच्या दरम्यान राहत्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. ही घटना राहुरी तालुक्यातील दरडगाव येथे घडली असून नातेवाईकांनी चार जणांवर संशय व्यक्त करून महिलेचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला. 

          या घटनेतील मयत जया नामदेव हारदे, वय ४० वर्षे, रा. दरडगाव, ता. राहुरी, यांनी सुमारे १५ दिवसापूर्वी विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. परंतू वेळीच उपचार मिळाल्यामुळे त्यावेळी त्यांचा जीव वाचला. दि. १३ मार्च २०२६ रोजी दुपारी १२ वाजे दरम्यान जया हारदे ह्या त्यांच्या राहत्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्या. परिसरातील नागरिकांनी त्यांना ताबडतोब राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. वैद्यकीय अधिकारी प्रवीण शिरसागर यांनी उपचारा पूर्वीच त्यांना मयत घोषित केले. 

        यावेळी मयत जया हारदे यांची मुलगी व मुलाने सांगीतले कि, शेतीच्या कारणावरुन जया हारदे यांचा सासरच्या लोकांकडून छळ सुरु होता. रावसाहेब रभाजी हारदे, मच्छिंद्र रावसाहेब हारदे, कल्पना मच्छिंद्र हारदे, लक्ष्मी रावसाहेब हारदे, सर्व रा. दरडगाव, ता. राहुरी. या चार जणांनी मयत जया हारदे यांना शारीरिक व मानसिक त्रास दिला. त्यांच्या त्रासाला कंटाळून जया हारदे यांनी आत्महत्या केली. किंवा सासरच्या लोकांनी त्यांना मारुन टाकले असावे. असा संशय व्यक्त करण्यात आला. जया हारदे यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या आरोपींना तात्काळ अटक करून त्यांना कठोरात कठोर शिक्षा करावी आणि आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी मयत जया हारदे यांच्या नातेवाईकांनी केली. 

           या घटने बाबत दरडगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. राहुरी पोलिस ठाण्यात दुपारी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. 

सदर महिलेच्या मुलाने व मुलीने असे सांगितले की आत्महत्या नसुन घात असल्याचे सांगितले आहे ,सखोल चौकशी व्हावी व आम्हाला न्याय मिळावा