टाकळीमिया रेल्वे बोगद्या जवळ ,अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला
राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथील रेल्वे बोगद्या जवळ एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आल्याची घटना समोर आली आहे. या मृत व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी राहुरी पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे.
राहुरी ता प्रती - देवेंद्र शिंदे
राहुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत टाकळीमिया शिवारातील रस्त्यालगत असलेल्या देवळाच्या परिसरात एका इसमाचा मृतदेह आढळून आला. ही घटना ११ मार्च २०२५ रोजी सायंकाळी सुमारे ८.५० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. संबंधित इसमाचे वय अंदाजे ३५ ते ४० वर्षे असून त्याची ओळख अद्याप पटलेली नाही.
मृत इसमाचे वर्णन मध्यम बांधा, दाढी-मिशा असलेला असा असून त्याच्या नाव- पत्त्या बाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून पुढील तपास राहुरी पोलीस करत आहे.
दरम्यान, या व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी राहुरी पोलीस ठाण्याने नागरिकांना आवाहन केले आहे. संबंधित व्यक्तीबाबत कोणाला माहिती असल्यास किंवा ओळख पटल्यास तात्काळ राहुरी पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले








