भारतीय संविधानामुळेच मी सभापती झालो- संजय डांगोरे
1.
काटोल:- डॉ. बाबासाहेब आंबेडकरानी संविधानात ओ बी सी ना 340व्या कलमानुसार आरक्षण दिले आहे.त्यानुसार काटोल पंचायत समितीच्या सभापतीचे आरक्षण ओ बी सी प्रवर्गासाठी निघाले त्यामुळेच मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या आरक्षणामुळेच सभापती झालो असे जाहीर उदगार नवनिर्वाचित सभापती संजय डांगोरे यांनी व्यक्त केले.
नवनिर्वाचित सभापती संजय डांगोरे यांचा सावळी व रिधोरा गावातील बौद्ध बांधवांच्या वतीने स्वागत समारंभ वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष व काटोल न प चे माजी सभापती दिगांबर डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली तर विजयजी दहाट यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. यावेळेस अशोकराव दुपारे, प्रेमानंद दुपारे, सुनिल देशभ्रतार, नलिनी गोंडाने वंचित बहुजन आघाडीचे काटोल शहर अध्यक्ष सुधाकर कावळे,मिनाताई डोंगरे यांच्यासह मोठ्या प्रमाणात बौद्ध बांधव उपस्थित होते.