पंचायत समिती सभागृह पारशिवणी येथे पोलीस पाटलांची सभा पार पडली*
पारशिवनी
*पंचायत समिती सभागृह पारशिवणी येथे पोलीस पाटलांची सभा पार पडली* BPS LIVE NEWS NETWORK. नागपूर:-आज रितेशभाऊ दुरुगकर जिल्हाध्यक्ष नागपूर यांच्या मार्गदर्शनात पंचायत समिती सभागृह पारशिवणी येथे पोलीस पाटलांची सभा पार पडली. पारशिवणी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पोलीस पाटलांची गाव कामगार संघात सामील व्हायची
बऱ्याच कालावधीत इच्छा होती ती आज पूर्णत्वास आली. यात तालुकाध्यक्ष म्हणून मा. श्री ताराचंद कांबळे पाटील यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली, उपाध्यक्ष पद मा. श्री शेषराव काकडे पाटील व सचिव पद श्रीमती रक्षणा गजभिये यांना देण्यात आले. सभेला उपस्थित सर्वांनी स्वयंस्फूर्तीने गाव कामगार संघाचे सदस्य पद घेतले. 45 पैकी 25 पोलीस पाटील यांनी सभेला उपस्थित राहून व काही पोलीस पाटील यांनी अप्रत्यक्षपणे नवनिर्वाचित कार्यकारिणीचे समर्थन केले आणि पोलीस पाटीलांच्या समस्यांना व मागण्यांना गाव कामगार संघच न्याय मिळवून देऊ शकतो असा विश्वास दर्शवला. स्थानिक दबावतंत्राला तंबी देत आज पारशिवणी येथील पोलीस पाटील यांनी आपले स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व उजागर केले आहे, उर्वरित पोलीस पाटील सुद्धा मानसिक गुलामी आणि स्थानिक दबावतंत्राचा बहिष्कार करून लवकरच पूर्ण पारशिवणी तालुका गावकामगार संघाच्या बॅनरखाली असेल