उद्योजक समाजाला सक्षम करतील : दुबई येथील उद्योजक भगवान गवई परिवर्तन महासंघ, महाप्रीत व बानाई द्वारा आंबेडकरवादी उद्योजकांसाठी बिझनेस फोरम कार्यक्रमात संपन्न झाला*
नागपूर
*उद्योजक समाजाला सक्षम करतील : दुबई येथील उद्योजक भगवान गवई परिवर्तन महासंघ, महाप्रीत वबानाई द्वारा आंबेडकरवादी उद्योजकांसाठी बिझनेस फोरम कार्यक्रमात संपन्न झाला* BPS live news network नागपुर : परिवर्तन महासंघ, महाप्रित, आणि बानाई द्वारा आयोजित आंबेडकरवादी उद्योजकांसाठी बिजनेस फोरम कार्यक्रमाचे आयोजन नागपूर येथे संविधान दिनी २६ नोव्हेंबर २०२२ रोजी दुपारी २ ते ९ वाजेपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक केंद्र, वर्धा रोडवरील उर्वेला कॉलनी नागपूर येथे मोठ्या
उत्साहात संपन्न झाले. ़कार्यक्रमाचे उद्घाटक व मुख्य अतिथी म्हणून भारत व दुबई येथील यशस्वी उद्योजक भगवान गवई होते व त्यांचेच अध्यक्षतेखाली सदरहू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटनपर बोलतांना उद्योजक भगवान गवई म्हणाले की, देशातील परिस्थिती बघता आरक्षण शेवटची घटका घेत आहे, असलेले सरकार मागासवर्गीय समाजाला पुन्हा गुलामीकडे नेऊ पाहत आहे, सरकारने खाजगीकरणाचा सपाटा सुरु केला आहे, म्हणून नोकरीच्या मागे न लागता बुद्धीस्ट समाजातील तरुण-तरुणीं उद्योजकांनी उद्योजक क्षेत्रामध्ये आपले करिअर घडवून ते
समाजाला उन्नतीकडे नेऊन समाजाला सक्षम करू शकतात असे प्रतिपादन दुबई येथील उद्योजक भगवानराव गवई यांनी केले. बिझनेस फोरम कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक एम.पी.वि.सी.डी.सी. महाप्रितचे ़कार्यकारी संचालक मा. प्रशांत गेडाम, तसेच महाप्रितचे प्रकल्प संचालक मा. केशव कांबळे, मुख्य अतिथी मा. जयंतभाई हरिया (उद्योजक मुंबई) विजयभाई राठोड (उद्योजक गुजरात) राहूल पाहुरकर - अध्यक्ष बानाई नागपूर, तसेच प्रमुख उपस्थितीमध्ये औरंगाबादचे उद्योजक सुभाष ठोकल, राजू गायकवाड (जी.एस.टी. ऑफीसर नागपूर), विजयकुमार गडलिंगे (मानवाधिकार वृत्त संपादक) प्रो. रविंद्र साळवे (साहित्यिक बुलढाणा) अमोल जंगम (उद्योजक उदयपूर), आनंद सुर्यवंशी (विधी आघाडी औरंगाबाद) मंगेश सोनावणे (उद्योजक पुणे) व समन्वयक म्हणून सुबोध जंगम नागपुर हे होते. सर्व प्रथम महामानवांच्या प्रतिमेला मालार्पण करून तसेच त्रिशरण-पंशिल ग्रहण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. वृक्षारोपणाचा प्रसार व्हावा या उद्येशाने सर्व मान्यवरांना वृक्षाची रोपे देवून सन्मानित करण्यात आले. पुढे बोलतांना उद्योजक भगवानराव गवई म्हणाले की, उद्योग क्षेत्रामध्ये पाऊल टाकणारांनी आमले माईंड सेट करून तशी मानसिकता तयार करावी लागेल. प्रत्येक जण हा कामाला बांधलेला असतो. तरुणांना आपल्या आयुष्यामध्ये फार स्ट्रगल करावे लागतात. म्हणून कोणीही हार न मानता उद्योग क्षेत्रामध्ये भरारी घेवू शकता. त्यासाठी जिद्द व चिकाटीची गरज आहे. तुम्ही स्वत:ला उद्योगामध्ये झोकून दिल्यास तुम्ही रोजगार मागणारे नव्हे तर रोजगार देणारे बणू शकता. एवढी ताकद उद्योग क्षेत्रामध्ये आहे. मारवाडी-गुजराती-बनीयांनी या क्षेत्रात नाव लौकीक केले आहे, कारण ते हार मानत नाहीत, आपल्या समाजातील तरुणांनी उद्योगाकडे कानाडोळा केल्याने तुम्हाला हवे ते मार्गदर्शन करण्यासाठी तुम्हाला शासकीय मदत कशी मिळेल यासाठी, तुम्ही उद्योगामध्ये सक्षस कसे व्हाल यासाठी परिवर्तन महासंघाची स्थापना केलेली आहे. आम्ही यापुढील आयुष्य परिवर्तन महासंघाचे माध्यमातून समाजाला येथील तरुण-तरुणींना उद्योजक क्षेत्रामध्ये वळविण्याकरीता घालवणार आहो. आपण या संधीचे सोने करावे असे कळकळीचे आवाहन देखिल गवई साहेब यांनी केले. त्यांनी स्वत:चे अनुभव यावेळी सांगीतले. सुरुवातीला मी देखिल मुंबईला चांगल्या प्रकारची नोकरी करत होतो. परंतू माझा कल हा उद्योजकांकडे होता. मी दुबईला जाऊन एका उद्योजकांकडे काम शिकून घेतले. तिथे विश्वास संपादन केला. सर्व बारकावे शिकून घेतले. व्यापार कसा करावा, कसा वाढवावा, याचे संपुर्ण ज्ञान मिळविले. माझ्याकडे बुद्धी होती परंतू पैसा नव्हता म्हणून दुबईतील उद्योजकांनी मला ऑफर दिली की, तुमचे ज्ञान व माझा पैसा अशी पार्टनशिप केली. त्या माध्यमातून मी दुबईमध्ये तेल कंपनीमध्ये प्रगती करू शकलो. प्रत्येकाकडे सर्व गोष्टी उपलब्ध नसतात. आपण सुद्धा पार्टनरशिपमध्ये उद्योगात उतरावे व आपला उद्योग सक्षम करावा तुम्हाला कधीही माहीतीची मदत लागल्यास आम्ही तुमच्या पाठीशी राहणार असे आश्वासन दिले. प्रास्ताविक सुबोध सर यांनी केले. गवई साहेबांनी आंबेडकरी विचाराच्या तरुणांसाठी उद्योजक निर्माण होण्यासाठी ही संधी उपलब्ध करून दिलेली आहे. त्यासाठी आपलाही दृष्टीकोण मोठा असावा, आपल्याला देशातील समाजाचे तरूण या माध्यमातून उभे करावयाचे आहे, उद्योजक घडवण्यासाठी हा प्रोग्राम आहे, तुम्ही प्रयत्न केल्यास हजारो मार्ग मिळतील. समाजाला उद्योजक क्षेत्रामध्ये क्रांती करावयाची आहे ही क्रांती या नागपूर शहरातून गवई साहेबांनी सुरु केली आहे. त्यानंतर राहूल पहुरकर बोलतांना म्हणाले की, २०१४- २०२२ पासून केंद्र सरकारने देशातील संविधान व आरक्षण नेस्तनाबूत केले आहे. साहेबांनी प्रगतीचे पाऊल भारतभर टाकले आहे. आपण उद्योजक बनावे, गवई साहेब ट्रेनिंग देतील, प्रेरणा देण्याचे काम गवई साहेबांकडून होते आहे या संधीचा फायदा घ्या असे आवाहन त्यांनी केले. त्यानंतर बिझनेस फोरम कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक एम.पी.वि.सी.डी.सी. महाप्रितचे ़कार्यकारी संचालक मा. प्रशांत गेडाम व महाप्रितचे प्रकल्प संचालक मा. केशव कांबळे साहेब यांनी शासनाच्या योजनाची माहीती देऊन कागदपत्र व्यवस्थीत असतील तर तुम्हाला शासनाच्या योजनांचा लाभ घेता येईल. लागणारे कागदपत्र तयार करा व साहेबांच्या माध्यमातून उद्योजक बना असे मोलाचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला तामिळनाडू, हरियाणा, दिल्ली, मध्य प्रदेश, बिहार, गुजरात तसेच महाराष्ट्रभरातून २५० उद्योजकांनी हजेरी लावली होती. पाच उद्योजकांनी प्रात्यक्षिके सादर केलीत. कार्यक्रमाला प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळाला.