बैलांचा मांडवासाठी आंबेगाव तालुक्यात साकारली छत्रपतींच्या गडकिल्यांची प्रतिकृती
प्रतिनिधी पुणे दि २५- उन्हाळा चालू झाला की त्यापासून बैलांचा बचाव करण्यासाठी शेतकरी गवताचे मांडव बनवत असतात.असाच एक आगळा वेगळा मांडव आंबेगाव तालुक्यातील मु. पेठ या ठिकाणी श्री.दिलीप म्हातारबा पवळे व त्यांच्या कुटूंबियांनी बांधला आहे .या मांडवाच वैशिष्ट्य म्हणजे हा पूर्ण मांडव ज्वारी च्या कडब्याचा व चक्क छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यासारखा बनवण्यात आला आहे.महाराष्ट्रातील एकमेव बैलगाडा मांडव म्हणून या मांडवाकडे पाहिलं जात आहे .पवळे कुटुंब उन्हाळ्यात बैलांना सावलीसाठी दरवर्षी थंडगार हवेशीर मांडव बांधत असतात.सध्या त्यांच्याकडे ६ बैल व एक घोडी आहे.तब्बल २४ वर्षापासून म्हणजेच आजोबा आणि पणजोबा पासुन पुढे चालत आलेली ही मांडव संस्कृती त्यांची पुढची पीढी जोपासत आहे.परंतु या वर्षी बैलांचा मांडव तयार करत असतानाच आपल्या कला कौशल्याचा वापर करत अखंड हिंदुस्थान चे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ऐतिहासिक गडकिल्ल्यांवरील बुरुज,महाल अशी प्रतिकृती ज्वारी चा कडबा, बांबू व वडाच्या पारंब्याच्या मदतीने तयार केली आहे तसेच मांडवावर राजमुद्रा , ढाल, तलवारी, तोफा ची प्रतिकृती बसवली आहे.विशेष म्हणजे या मांडवात बैलगाडा शर्यती मुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला आलेली बळकटी, बैलगाडा शर्यतीला शासनाने लावलेल्या नियम अटी चे फलक लावुन एकप्रकारे जनजागृती ही केली आहे.