राष्ट्रीय युवा मराठी पत्रकार संघ-सावनेरची कार्यकारिणी गठीत .
राष्ट्रीय युवा मराठी पत्रकार संघ-सावनेरची कार्यकारिणी गठीत .
Bps-live-News-network-maharashtra
प्रतिनिधी- वाहीदशेख
सावनेर -दि.6 जुलै, राष्ट्रीय युवा मराठी पत्रकार संघ सावनेरची नवीन कार्यकारिणी नुकतीच घोषित करण्यात आली. सावनेर तालुका शाखा- पत्रकार संघाची सभा सावनेर येथील वरिष्ठ पत्रकार सुधाकरजी बागडे यांचे निवासस्थानी असलेले बागडे लॉन मध्ये संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.संघपाल गडलिंग यांच्या नेतृत्वात दि.5 जुलै (बुधवार)दुपारी 2 वाजता घेण्यात आले .आणि राष्ट्रीय युवा मराठी पत्रकार संघ शाखा-सावनेर ची कार्यकारिणी गठित करण्यात आली.संघटनेचे वरिष्ठ पत्रकार सुधाकरजी बागडे यांच्या अध्यक्षते खाली बैठक घेण्यात आली .त्यात अध्यक्षपदी सुधाकर बागडे यांची एकमताने निवड करण्यात आली.
संघाच्या कार्यकारिणीची रूपरेषा व मार्गदर्शन राष्ट्रीय युवा पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संघपाल गडलिंग , संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष गजानन ढाकुळकर आणि सुदर्शन गोडघाटे यांनी केले.
राष्ट्रीय अध्यक्ष संघपाल गडलिंग यांनी पत्रकारितेच्या संदर्भात आपले मोलाचे विचार व्यक्त केले.
गठित कार्यकारिणीतील सर्व सन्माननीय पदाधिकारी यांनी बैठकीत उपस्थित प्रसार माध्यम आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांसमोर आपले मनोगत व्यक्त केले.
यासोबतच सुधाकर बागडे यांची कन्या डॉ.साची बागडे यांना डॉक्टर्स दिनानिमित्त पुष्गुच्छ देऊन पुढील उज्ज्वल भविष्यासाठी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संघपाल गडलिंग व उपस्थित पदाधिकारी व पत्रकारांनी भरभरून शुभेच्छाही दिल्या.
कार्यक्रमाचे आयोजन व अध्यक्षता सुधाकर बागडे , संचालन-अरुण ऋषिया व आभार प्रदर्शन संजय टेंभेकर यांनी केले.
सभेला उपस्थित सम्मानिय पत्रकार कैलाश शर्मा, राहुल सावजी, दिलीप घोडमारे, दिनेश चौरसिया, तुषार पडोळे , रविना श्यामकुळे, सुरेश मारोतकर, सुनील सोमकुवर, संजय राऊत, वाहिद शेख, निखिल शेंडे, मंगेश उराडे इत्यादि मान्यवरांनी संघातील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .