अवैध व्यावसायिकांवर कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला.

अवैध व्यवसायिक आरोपींकडून पोलिसांवर प्राणघातक हल्ला.
सविस्तर वृत्त असे आहे की अवैध धंदया बाबतची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाल्यामुळे त्यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी पोलीस पथक कोपरगाव तालुक्यातील जवळके येथील भिल्ल वस्ती मध्ये गेले असता.
टारगट गुंड प्रवृत्तीच्या लोकांना जमून सदर आरोपींनी पोलिसांशी वाद विवाद घालीत पोलीस पथकाला शिवीगाळ दमदाटी करीत हाताने लाथा लाथाबुक्क्यांनी, लाकडी दांडक्याने ,दगडाने जबरी मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
यामध्ये पोलीस कर्मचारी जबर जखमी झाले. तसेच पोलिसांकडील मोबाईल हिसकावून फोडले , पोलिसांच्या खाजगी वाहनांची तोडफोड केली व त्यांनी दहशत माजवली. या हल्ल्या दरम्यान आरोपींनी पोलिस कॉन्स्टेबल भाऊसाहेब दौलत पवार यांच्या गळ्यावर वार करून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न देखील केला.
सदर प्रकरणी दहा ते पंधरा गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यातील आठ आरोपींना पोलिसांनी अटक केले आहे.
सदर घटनेचा सखोल तपास शिर्डी पोलिस करीत आहे.