अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सौ. मंगल उगले व सौ . अर्चना ढोले सम्मानित .

अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सौ. मंगल उगले व सौ . अर्चना ढोले सम्मानित .

अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सौ. मंगल उगले, सौ. अर्चना ढोले सन्मानित....

 

आव्हाणे बु :- शेवगाव तालुक्यातील आखतवाडे येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली, यावेळी सौ. मंगल उगले व सौ. अर्चना ढोले यांनी बचत गटाच्या माध्यमातून उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. सौ. मंगल उगले व सौ. अर्चना ढोले यांनी बचत गटातील महिलांना वेळोवेळी कर्ज उपलब्ध करून दिले आणि त्या महिलांनी ही त्याची वेळेत परत फेड करत लाभ घेतला.याची दखल घेऊन राजमाता अहिल्यादेवी होळकर पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

 

          यावेळी रघुवीर उगले व रहीम शेख यांच्या हस्ते हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. प्रसंगी बळीराम उगले, गणेश भागवत, अजिनाथ सांगळे, सेवा सोसायटीचे चेअरमन सोमनाथ उगले, ग्रामसेवक गोरे भाऊसाहेब, पोपट राशींनकर, कृषी सहाय्यक ढाकणे, सुनील उगले प्रताप घाडगे, ज्ञानेश्वर उगले,उद्धव उगले, सदलखा पठाण,रहीम शेख, ग्रामपंचायत कर्मचारी महेंद्र डमाळ,आण्णा सरोदे, नितीन बनकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्तित होते.