नूतन तलाठी मंगल गुसिंगे यांचे स्वागत तर तलाठी बालाजी मलदोडे यांना निरोप.

नूतन तलाठी मंगल गुसिंगे यांचे स्वागत तर तलाठी बालाजी मलदोडे यांना निरोप.

नूतन तलाठी मंगल  गुसिंगे यांचे स्वागत तर बालाजी मलदोडे यांना निरोप.

   नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील आत्ताच झालेल्या प्रशासकीय बदलीत तलाठी बालाजी मलदोडे यांची बदली झाली तर त्या जागेवर मंगल गुसिंगे यांची देडगाव सजेवर नियुक्ती झाली . त्याबद्दल ग्रामस्थेच्या वतीने नागरी सन्मान करण्यात आला.

      त्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने बदली होऊन जाणारे तलाठी बालाजी मलदोडे भाऊसाहेब यांना निरोप देण्यात आला. तर नूतन तलाठी मंगल गुसिंगे यांचे स्वागत करण्यात आले. हा कार्यक्रम जेष्ठ नागरिक बाजीराव पाटील मुंगसे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक गावचे विद्यमान सरपंच चंद्रकांत यांनी केले. त्यांनी नूतन आलेल्यांचे स्वागत तर बदली होऊन गेलेला निरोप देत शुभेच्छा दिल्या.यावेळी ज्येष्ठ पत्रकार बन्सी भाऊ एडके, बळीराराज्य संघटनेचे अध्यक्ष मच्छिंद्र मुंगसे, कांदा व्यापारी हरिभाऊ तागड आदींनी आपले मनोगत व्यक्त करत पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

यावेळी निरोप घेताना बालाजी मलदोडे यांनी आपल्या भावना व्यक्त करत या गावाने मला खूप प्रेम दिलेले आहे .अतिशय सोज्वळ गाव असल्याने गेली तीन वर्षे नऊ महिने प्रशासकीय कामात मला खूप शिकायला मिळाले. व गावनी साथ दिल्याने गावची सेवा करण्यास संधी मिळाली. माझा हा निरोप समारंभ कायम माझ्या मनी राहील .मी या गावचा कायम ऋणी राहील अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या.

तर नूतन तलाठी मंगल  गुसिंगे यांनी पदभार स्वीकारताना म्हणाल्या की ,मलाही गावाने अशी साथ द्यावी .नक्कीच कोणाच्याही कामाची अडवणूक होणार नाही. सर्वसामान्य लोकांची कामे वेळेवर करून सर्वांना विविध योजना विषयी माहिती देत चांगले काम करण्याचा प्रयत्न करेल अशी आश्वासित केले.

    यावेळी विविध शाखेच्या व संघटनेच्या वतीने दोघांचाही सन्मान करण्यात आला.

       या कार्यक्रमासाठी देडगाव मंडलाधिकारी सुनील खंडागळे, ग्रामविकास अधिकारी संतोष उल्हारे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.गवळी, खरेदी विक्री संघाचे संचालक कडूभाऊ तांबे, उपसरपंच बाळासाहेब मुंगसे, अशोक पाटील मुंगसे, बालाजी देवस्थानचे अध्यक्ष नवनाथ मुंगसे, माजी सरपंच रामेश्वर गोयकर, माजी उपसरपंच लक्ष्‍मणराव गोयकर,विश्वस्त रामभाऊ मामा कुटे, ग्रामपंचायत सदस्य विश्वास हिवाळे, किशोर वांढेकर ,भिमराज मुंगसे, फकीरचंद हिवाळे, अंबादास मुंगसे, ग्रामपंचायत कर्मचारी गणेश तांबे, बाळासाहेब म्हस्के ,संजय कुटे, किरण मुंगसे, नितीन हिवाळे बालाजी दूध डेरीचे चेअरमन प्रशांत कदम आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार युनूस पठाण यांनी केले तर आभार किशोर वांढेकर यांनी मानले.