अल्पवयीन मुलीस आमिष दाखवून सोलापूर कडे पळवून नेणाऱ्या आरोपीच्या राहुरी पोलिसांनी 4 तासात आवळल्या मुसक्या .
*अल्पवयीन मुलीस कशाचे तरी आमिष दाखवुन सोलापूर कडे पळवून नेना-या आरोपीस 4 तासात शिरूर येथुन राहुरी पोलिस तपास पथकांनी घेतले ताब्यात*
सदर घटनेची हकिकत अशी की दि.27/08/2024 रोजी सकाळी 7.00 वाजता राहुरी तालुक्यातील एका गावातून दुसऱ्या गावातील कॉलेजला गेलीली अल्पवयीन तरुणी घरी परत आली नाही म्हणून मुलीचे अपहरण झाल्याबाबत मुलीचे वडीलांनी राहुरी पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता कलम 137 (2) प्रमाणे तक्रार सायंकाळी 5.00 वाजता दाखल केल्याने दाखल गुन्हाचे कुठलेही प्रकारचा मागमूस नसताना गोपनीय बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की इसम नामे विशाल विठ्ठल निकम, वय 19 वर्ष रां रांजणगाव पाडळी तालुका पारनेर याने सदर अल्पवयीन मुलीस शिरूर येथे अपहरण करून नेले आहे व तेथून सोलापूर येथे मजुरी साठी घेवून जाणार आहे अशी माहिती मिळाल्याने राहुरी पोलीस स्टेशनचे तपास पथक शिरूर येथे रवाना होऊन आरोपीस शिरूर पोलीस स्टेशन हद्दीतून दिनांक 27/8/2024 रोजी शिरूर येथील बस स्थानक येथे 21.30 वा. मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेऊन अल्पवयीन मुलीची सुटका करुन तीस पालकांच्या ताब्यात देऊन आरोपीस पुढील कारवाई करीता अटक करण्यात आली आहे.
सदर कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला अहमदनगर, वैभव कुलुबर्मे अपर पोलिस अधीक्षक अहमदनगर, बसवराज शिवपूजे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपुर विभाग जि. अहमदनगर यांच्या मार्गदर्शनाखाली संजय आर.ठेंगे पोलीस निरीक्षक राहुरी पोलीस स्टेशन, पोलीस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे, पोलीस हवालदार सुरज गायकवाड, राहुल यादव, पोलीस नाईक प्रविण बागुल, प्रमोद ढाकणे, सतीश कुऱ्हाडे, नदीम शेख, सचिन ताजणे ,अंकुश भोसले, इफ्तेकार सय्यद तसेच मोबाईल सेल श्रीरामपुर चे सचिन धनाड, संतोष दरेकर यांनी केली आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे हे करीत आहेत.
सदर गुन्ह्याबाबत तसेच इतर काही माहीती द्यावयाची असल्यास संजय ठेंगे, पोलीस निरीक्षक ,राहुरी पोलीस स्टेशन संपर्क - 8788891147 वर माहिती द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे .