कृषी विद्यापीठामध्ये पदविका अभ्यासक्रमांसाठी विशेष प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार -कुलसचिव श्री.अरुण आनंदकर
*कृषि विद्यापीठामध्ये पदविका अभ्यासक्रमांसाठी विशेष प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार*
*- कुलसचिव श्री. अरुण आनंदकर*
*राहुरी विद्यापीठ, दि. 13 सप्टेंबर, 2024*
महात्मा फुले कृषि विद्यापीठामध्ये सन 2024-25 या शैक्षणीक वर्षासाठी कृषि तंत्र पदविका, कृषि तंत्र निकेतन व माळी अभ्यासक्रमासाठी दि. 14 सप्टेंबर, 2024 ते दि. 4 ऑक्टोबर, 2024 या कालावधीत विशेष फेरी राबविण्यात येणार आहे. सदर प्रवेश प्रक्रियेमार्फत ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यावयाचा असेल अशा विद्यार्थ्यांनी https://mpkv.diplomaadmission.com या संकेत स्थळावर नव्याने नोंदणी करुन नोंदणी शुल्क भरणे आवश्यक आहे. सदरील प्रवेश प्रक्रियेमध्ये महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील उमेद्ववारांना अर्ज करता येतील. या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची सुरुवात दि. 14 सप्टेंबर, 2024 ला सुरु होणार असुन ऑनलाईन प्रवेश अर्ज त्यासोबतची आवश्यक ती स्कॅन केलेली कागदपत्रे संकेतस्थळावर आपलोड करावयाचा अंतिम दि. 19 सप्टेंबर, 2024 असा आहे. दि. 21 सप्टेंबर, 2024 रोजी तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिध्द करण्यात येणार असुन अंतीम गुणवत्ता यादी दि. 24 सप्टेंबर, 2024 रोजी प्रसिध्द करण्यात येणार आहे. जिल्हानिहाय पहिल्या प्रवेश फेरीच्या वाटप यादीची प्रसिध्दी तसेच संबंधीत विद्यालयात उपस्थित राहुन प्रवेश घेण्याचा कालावधी अनुक्रमे दि. 25 सप्टेंबर, 2024 व दि. 26 सप्टेंबर, 2024 असा आहे.
या प्रवेश प्रक्रियेमध्ये रुपांतरासह दुसर्या प्रवेश फेरीच्या वाटप यादीची प्रसिध्दी व संबंधीत विद्यालयात उपस्थित राहुन प्रवेश घेण्याचा कालावधी अनुक्रमे 27 सप्टेंबर, 2024 व दि. 28 सप्टेंबर, 2024 असा आहे. गुणवत्ता यादीनुसार घटक विद्यालयस्तरावर भरावयाच्या रिक्त जागांचा तपशील दि. 29 सप्टेंबर, 2024 रोजी प्रसिध्द करण्यात येणार असुन रिक्त जागांकरिता जागेवर प्रवेश फेरी अर्थात स्पॉट राऊंड हा दि. 30 सप्टेंबर, 2024 ते दि. 1 ऑक्टोबर, 2024 या कालावधीत राबविण्यात येणार असल्याचे विद्यापीठाचे कुलसचिव श्री. अरुण आनंदकर यांनी सांगितले आहे.
महात्मा फुले कृषि विद्यापीठामध्ये कौशल्यावर आधारीत शिक्षण दिले जाते. यामध्ये इयत्ता 10 वी नंतर माळी पदविका तसेच निम्नस्तर कृषि शिक्षणामध्ये दोन वर्षाची कृषि तंत्र पदविका आणि तीन वर्षाची कृषि तंत्र निकेतन पदविका या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. या पदविकांमध्ये कौशल्य आधारीत प्रात्यक्षिकांद्वारे विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते. ज्या विद्यार्थ्यांनी तीन वर्षाच्या कृषि तंत्र पदविकेमध्ये प्रवेश घेतलेला आहे त्या विद्यार्थ्यांना कृषि पदविमध्येसुध्दा प्रवेश मिळतो. या पदविका धारण करणार्या विद्यार्थ्यांना सरकारी तसेच खाजगी आस्थापनांमध्ये रोजगाराच्या भरपुर संधी उपलब्ध आहेत. या शिक्षणामुळे विद्यार्थी स्वतःचा व्यवसाय सुरु करु शकतात व दुसर्यांनाही रोजगाराच्या संधी निर्माण करुन देवू शकतात.* -*डॉ. पी.जी. पाटील, कुलगरु, मफुकृवि, राहुरी*