वस्तीगृहामध्ये मुलींना जेवण वेळेवर भेटत नसल्याने उपोषण करण्यात आले

अंबड आर्थिक दृष्ट्या मागास व मागासवर्गीय मुलींच्या वस्तीग्रह मध्ये मुलींना जेवण पुरवठा करणारी बहुजन हिताय एजन्सी जेवण पुरवठा ही वेळेवर करत नसल्याने आज विद्यार्थिनीने अंबड तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले. उपोषणकर्त्या विद्यार्थिनींना माजी मंत्री राजेश भैय्या टोपे यांनी फोन द्वारे संपर्क साधून त्यांच्या मागण्या लक्षात घेऊन संबंधित अधिकारी यांना सूचना केल्या वेळेवर सर्व सोयी सुविधा पुरवाव्यात .तसेच स्थानिक आमदार नारायण भाऊ कुचे जालना जिल्हा शासकीय वसतिगृह निरीक्षण समिती सदस्य राहुल व्ही खरात, रिपाई जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश मामा रूपवते, औरंगाबाद समाज कल्याण उपायुक्त तसेच जालना सहायक समाज कल्याण अधिकारी अमित घावले समाज कल्याण चे सर्व अधिकारी कर्मचारी पोलीस उपनिरीक्षक योगेश चव्हाण आधी आंबड वस्तीग्रह येथे उपस्थित होते .यावेळी उपस्थित राहुन पाहणी केली असता त्या ठिकाणी एक्सपायर झालेले बिस्किट आढळले स्थानिक आमदार नारायण भाऊ कुचे आणि जालना जिल्हा शासकीय वस्तीगृह निरीक्षण समिती अशासकीय सदस्य राहुल व्ही खरात, रिपाई जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश मामा रुपवते,संबंधित पुरवठादार एजन्सीवर गुन्हा दाखल करावा असे मागणी लावून धरली.. यावेळी रात्री 11 वाजेपर्यंत वस्तीग्रह मध्ये सर्व नेते मंडळी उपस्थित होते तसेच शहरातील सर्व पत्रकार बांधव उपस्थित होते. एक्सपायर झालेले सर्व बिस्किट सील पॅक करून स्थळ पंचनामा करून गुन्हा दाखल करण्यासाठी पुढील प्रक्रिया सुरू आहे