ओ आमदार साहेब आम्हाला रस्ता देताय का रस्ता, चेडगाव ब्राह्मणी शिव रस्त्यावरील ग्रामस्थांची आर्त हाक .
राहुरी तालुक्यातील चेडगाव ब्राह्मणी रस्ता हा मुख्य रस्ता खराब तर झालाच आहे परंतु चेडगाव आणि ब्राह्मणी हा शिवरस्ता अतिशय खराब झाला असून या रस्त्याचे काम लवकरात लवकर मार्गी लावावे अशी मागणी या शिवरस्त्यावरील ग्रामस्थांनी केली आहे .
राहुरी तालुक्यातील चेडगाव येथील रस्त्यांची दुर्दशा अतिशय बिकट झाली असून याकडे आज पर्यंत कोणीही लक्ष दिले नाही असे दिसत आहे .मुख्य रस्त्यांची दुर्दशा अशी असेल तर या ठिकाणच्या शिव रस्त्याची परिस्थिती त्याहूनही बिकट आहे .साधारणपणे 26 फूट रुंद व 2.5 किलोमीटर लांब असा हा रस्ता आहे .आजमितीस या रस्त्याची रुंदी फक्त आठ फूट एवढीच राहिली आहे .रस्त्याचे काम होत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी रस्त्यालाच नांगर लावून अतिक्रमण केले आहे .
सन 1999 ते 2000 या वर्षी किरकोळ प्रमाणात मुरूम टाकून या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली होती .आज 23 वर्षे होऊनही या रस्त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे येथील नागरिकांनी सांगितले आहे .
या शिव रस्त्याच्या आजूबाजूला अल्पसंख्यांक मागासवर्गीयांची वस्ती आहे .या ठिकाणी इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत शाळा आहे .या शाळेला राष्ट्रपती पुरस्कारही प्राप्त आहे .पावसाळ्याच्या दिवसात या शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांची अवस्था अतिशय वाईट असते .या शिवरस्त्यावरून पावसाळ्यात पायी चालणे ही अवघड होते .येथील ग्रामस्थ पावसाळ्यामध्ये अतिशय भीषण परिस्थितीतून तोंड देऊन जीवन जगत आहेत .
अनेक वेळा जिल्हा परिषद व येथील लोकप्रतिनिधींना प्रस्ताव देऊनही आज पर्यंत कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही ही फार मोठी शोकांतिकाच म्हणावी लागेल .आम्हीही माणसं आहोत,आमच्या मुलांनाही चांगले शिक्षण घेण्याचा अधिकार आहे, आमच्या माता भगिनींनाही दवाखान्यात जाण्यासाठी अतोनात हाल सोसावे लागत आहेत,मग आमचा वापर फक्त मतदानापुरताच केला जातो काय ? असा सवाल येथील नागरिकांनी केला आहे .
दोन गावांच्या मध्ये आमची होणारी ससेहोलपट थांबवा आणि आम्हाला चांगला रस्ता बनवून द्या .जर आमच्या या मागणीकडे कोणीही लक्ष दिले नाही तर आम्ही या ठिकाणी मतदान मागण्यासाठी कोणालाही येऊ देणार नाही अशी तीव्र प्रतिक्रिया येथील नागरिकांनी दिली आहे . जो आमच्या मागण्या पूर्ण करील त्याच्याच पाठीशी आम्ही सर्व उभे राहू असे मत येथील नागरिकांनी Delhi91 bps live news शी बोलताना व्यक्त के
ले आहे .