जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गो यांची राहुरी पोलीस स्टेशनला भेट
राहुरी ता प्रती डॉ देवेंद्र शिंदे
नगर जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी शनिवारी, दिनांक 24 जानेवारी रोजी राहुरी पोलीस ठाण्याला भेट दिली. या भेटी दरम्यान, त्यांनी पोलीस ठाण्याच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेत अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी, पोलीस ठाण्याच्या अभिलेखांची तपासणी करताना, गुन्ह्यांची नोंद, तपासाची प्रगती, प्रलंबित गुन्हे, तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाय योजनांची माहिती त्यांनी घेतली. नागरिकांच्या तक्रारींवर तात्काळ व प्रभावी कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले. तसेच, गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी गस्त वाढवणे, अवैध व्यवसायांवर कठोर कारवाई करणे, महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणे आणि सायबर गुन्ह्यांबाबत जनजागृती करण्यावर विशेष भर देण्याच्या सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक घार्गे यांनी केल्या. विशेष म्हणजे राहुरी पोलीस स्टेशन चे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी ऑपरेशन मुस्कान अंतर्गत 101 मुलींचा शोध घेऊन पालकांच्या स्वाधीन केल्या बद्दल आणि प्रलंबित गुन्हे कमी केल्याबद्दल त्यांचे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी कौतुक करून त्यांचा सन्मान केला आणि चांगल्या कामगिरीबद्दल पोलीस कर्मचाऱ्यांचे देखील त्यांनी कौतुक करत, भविष्यातही अधिक जबाबदारीने काम करण्याचा सल्ला दिला.त्याचबरोबर राहुरी पोलीस स्टेशन चे राहुरी टाऊन चे इन्चार्ज तुळशीदास गिते यांना चांगल्या कामगिरी बद्दल विशेष गुण देऊन सन्मानित केले.यावेळी, पोलीस उपअधीक्षक जयदत्त भवर, पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, पोलीस उपनिरीक्षक सुदाम शिरसाठ. पोलीस पोलीस सहाय्यक उपनिरीक्षक जाधव. पो स इ. समाधान फडोळ. वाघ.सप्तर्षी. आदींसह पोलीस अधिकारी, अंमलदार उपस्थित होते.










