मुळा एज्युकेशन सोसायटीच्या महात्मा गांधी माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा.
अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी / संभाजी शिंदे
महात्मा गांधी माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा.
नेवासा तालुक्यातील मुळा एज्युकेशन सोसायटीच्या महात्मा गांधी माध्यमिक विद्यालय शिरेगाव खेडले परमानंद येथे महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी महाराष्ट्र दिनाचे महत्त्व विशद करताना
मे १९६० रोजी मराठी भाषिकांचे स्वतंत्र राज्य म्हणून महाराष्ट्राची निर्मिती झाल्याच्या स्मरणार्थ दरवर्षी १ मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा केला जातो. हा दिवस महाराष्ट्रातील लोकांच्या अभिमानाचे आणि संस्कृतीचे प्रतीक आहे, म्हणूनच राज्यभरात विविध सांस्कृतिक कार्यक्रम व ध्वजारोहण केले जाते.
बॉम्बे पुनर्रचना कायदा १९५६ नुसार भाषा आधारावर महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी अनेक वर्षे झालेल्या संघर्षाचा आणि बलिदानाचा हा दिवस एक कळस आहे.
या दिवशी सरकारी कार्यालये, शाळा आणि सार्वजनिक ठिकाणी ध्वजारोहण केले जाते.
१ मे हा आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणूनही साजरा केला जातो, म्हणून महाराष्ट्रात हा दिवस कामगारांचा सन्मान करण्याचाही दिवस आहे. अशी प्रस्तावना सुभाष जाधव सर यांनी केली.
"शिवरायांचा वारसा, महाराष्ट्राचा अभिमान!" सर्वांना महाराष्ट्र दिनानिमित्त मानाचा मुजरा करून मराठी अस्मिता, मराठी संस्कृती, आणि मराठी मनाच्या अभिमानाचा दिवस १ मे या महाराष्ट्र दिनाच्या सर्व विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक एल टी ढाले सर त्यांनी शुभेच्छा दिल्या.ज्येष्ठ शिक्षक गडाख सर यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.
यावेळी पत्रकार संभाजी शिंदे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
सर्वांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देऊन छत्रपती शिवरायांना वंदन केले.








