महात्मा फुले कृषी विद्यापीठात 67 वा महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा

महात्मा फुले कृषी विद्यापीठात 67 वा महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा

*महात्मा फुले कृषी विद्यापीठात 67 वा महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा*

 

 *राज्याच्या कृषी क्षेत्रात महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे भरीव योगदान* -*कुलगुरू डॉ. विलास खर्चे* 

 

         विद्यापीठाने संशोधन, शिक्षण व विस्तार या तीनही क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी केली आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने संशोधनामध्ये गेल्या वर्षी शेतकऱ्यांना उपयोगी ठरणाऱ्या विविध पिकांच्या 7 वाणांची निर्मिती , 3 कृषि अवजारे व यंत्रांची निर्मिती व 59 तंत्रज्ञान शिफारशी विद्यापीठाने दिल्या आहेत. विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील विविध कृषी महाविद्यालये, कृषी तंत्र विद्यालये याद्वारे दर्जेदार कृषी शिक्षणाचे काम सुरू आहे. कृषी विस्तार कार्यामध्ये आपण विविध उपक्रम आयोजित करत असतो. यावर्षी यामध्ये फुले कृषी महोत्सवाचे यशस्वी आयोजन केलेले आहे तसेच दहा जिल्ह्यांमध्ये मॉडेल व्हिलेज विकसित करण्याचा मानस आहे. विद्यापीठाने 6900 क्विंटल बियाणे उत्पादन करून बीज्योत्पादनाच्या उद्दिष्टामध्ये मोठी प्रगती साधलेली आहे. यावर्षी एल नीनोच्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण कमी राहणार असल्याचे संकेत आहेत तरी या दृष्टीने आपल्या तंत्रज्ञानाच्या वापराने शेतीची उत्पादकता कशी वाढेल यासाठी विद्यापीठ सज्ज असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी केले. 

         महात्मा फुले कृषी विद्यापीठात 67 वा महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मा. कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, अधिष्ठाता (कृषी) डॉ. साताप्पा खरबडे, संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके, कुलसचिव श्री. राजेंद्रकुमार पाटील, विद्यापीठ अभियंता श्री. मिलिंद ढोके, नियंत्रक डॉ. बी. टी. पाटील, कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सचिन नलावडे व कृषी तंत्रज्ञानचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. विजू अमोलिक उपस्थित होते. विद्यापीठात झालेल्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमास विविध विभागांचे विभाग प्रमुख, अधिकारी, शास्त्रज्ञ, विद्यार्थी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरक्षा अधिकारी श्री. गोरक्षनाथ शेटे यांनी केले.