राहुरी तहसील मध्ये चाललय तरी काय रात्रीच्या वेळी वाहनांची होतीय खदल बदल

तहसीलच्या आवारात रात्रीस खेळ चाले

राहुरी ता प्रती -डॉ देवेंद्र शिंदे

राहुरी तहसील कार्यालयात अनेक महिला व पुरुष कर्मचारी काम करतात मात्र काही बोटावर मोजणे इतक्या खावगीरी करणारे अधिकाऱ्यांमुळे महसूल प्रशासन बदनाम होत आहे कारवाई करून आणलेली वाहने तोडपानी करून मध्यरात्री सोडले जातात या घटनांबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सखोल चौकशी करून खाऊगिरी करणाऱ्या कर्मचारी अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी अशी जनतेमधून मागणी होत आहे 

राहुरी महसूल विभाग अंतर्गत राहुरी तालुक्यात वाळू तस्करी ला आळा घालण्यासाठी काही अधिकारी प्रामाणिकपणे काम करतात परंतु काही भ्रष्ट अधिकारी पकडलेली वाळूची वाहने तोडपाणी करून परस्पर सोडून दिल्याच्या घटना घडताना दिसत आहेत काल दिनांक 22 जानेवारी 2026 रोजी रात्री एक विना नंबरचा आकाशी कलरची छोटी मालवाहतूक गाडी काही वाळू तस्कारांनी महसुली विभागाच्या आवारात आणून लावली आणि त्या बदल्यात 608 टेम्पो काढून नेला सदर 608 टेम्पोवर कारवाई नेमकी कोणी केली तसेच तो कारवाई करून सोडला की तोडपाणी करून सोडला याबाबत परिसरात चर्चा सुरू आहे रात्रीच्या दरम्यान महसूल च्या ताब्यात असलेली वाहने बाहेर कशी सोडली जातात याची चौकशी होणे गरजेचे आहे तसेच तोडपाणी करणारे भ्रष्ट अधिकारी व कर्मचारी यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी जनतेमधून होत आहे राहुरी महसूल विभागात नवीन आलेले तहसीलदार अमित पवार यांनी याप्रकरणी सखोल चौकशी करून या प्रकरणात सामील असलेल्या वाळू तस्कर तसेच महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

रात्रीच्या वेळी वहनांची होतय आदला बदली