पानेगाव येथे सोनई येथील कृषी महाविद्यालयाच्या कृषी कन्या कृषीदूत म्हणून दाखल.
प्रतिनिधी खेडले परमानंद नेवासा
नेवासा तालुक्यातील पानेगाव येथे कृषि महाविद्यालय सोनई येथील कृषिकन्यांचे आगमन झाले असून यावेळी पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी या कृषिदूतांचे स्वागत केले. महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी संलग्न असलेल्या कृषि महाविदयालय सोनई येथे या विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. महाविद्यालयाच्या ग्रामीण कृषी जागरूकता व कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत कृषिकन्या कु. प्रणोती सस्ते, कु.सृष्टी कुदळे, कु. स्मिता लोखंडे, कु.कुपिराला साई शिवानी, कु.पटलोला सुप्रथिका रेड्डी, कु. मोडियम चव्वा लावण्या हे १० आठवडे गावात
राहून विविध प्रात्यक्षिके व उपक्रम राबवणार आहेत.
याप्रसंगी गावचे सरपंच . संजय जंगले, उपसरपंच रामभाऊ जंगले, नवनाथ जंगले, . सुनील चिंधे उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी कृषिकन्यानी महाविदयालयाचे प्राचार्य
मोरे सर व कार्यक्रम अधिकारी प्रा. पलघडमल मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.